अखेर प्रतीक्षा संपली! आमिर खान प्रोडक्शन्सच्या
‘सितारे ज़मीन पर’चा बहुप्रतिक्षित ट्रेलर प्रदर्शित
प्रेक्षकांनी केला कौतुकाचा वर्षाव
सोलापूर (कटूसत्य वृत्त):-‘सितारे ज़मीन पर’ हा २००७ साली आलेल्या ‘तारे ज़मीन पर’ या बॉलिवूडच्या अत्यंत संवेदनशील आणि प्रिय चित्रपटाचा आध्यात्मिक सिक्वेल असून तो आता तब्बल 18 वर्षांनंतर तो एक ताजातवाना आणि आनंददायक अनुभव घेऊन परत आला आहे. सितारे ज़मीन पर’ हा चित्रपट २० जून २०२५ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
२००७ च्या सुपरहिट ‘तारे ज़मीन पर’ नंतर, ‘सितारे ज़मीन पर’ या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. या चित्रपटाचा मजेदार आणि रंगीबेरंगी पोस्टर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला होता आणि आता त्यानंतर मेकर्सनी अखेर बहुप्रतिक्षित ट्रेलर प्रदर्शित केला आहे — जो प्रेम, हास्य आणि आनंदाने भरलेला एक परिपूर्ण ट्रीट आहे.
या चित्रपटात आमिर खान बौद्धिकदृष्ट्या अपंग मुलांचा बास्केटबॉल कोच साकारताना दिसणार आहे. हा ट्रेलर संपूर्णपणे प्रेक्षकांसाठी एक सुखद अनुभव आहे. यात विनोद, भावनिक स्पर्श आणि अनेक हास्याचे क्षण आहेत, जे एका सिच्युएशनल कॉमेडीचा आदर्श नमुना सादर करतात.
या चित्रपटात आमिर खान आणि जेनेलिया देशमुख प्रमुख भूमिकेत असणार आहेत. याशिवाय चित्रपटात आमिर खान प्रोडक्शन्सने १० नवोदित कलाकारांना लॉन्च केले आहे. त्यामध्ये आरूष दत्ता, गोपी कृष्ण वर्मा, संवित देसाई, वेदांत शर्मा, आयुष भानसाली, आशीष पेंडसे, ऋषी शहानी, ऋषभ जैन, नमन मिश्रा आणि सिमरन मंगेशकर हे आहेत.
या ट्रेलरला अधिक खास बनवणारी गोष्ट म्हणजे ट्रेलरच्या आधी दाखवलेला १.५ मिनिटांचा स्पेशल व्हिडीओ, ज्यात ईशान आणि निकुंभ सर यांच्यातील मजेदार संवाद दाखवण्यात आला आहे ज्याने प्रेक्षकांना थेट २००७ मधील सुपरहिट चित्रपटाच्या आठवणींत नेले.
0 Comments