पंचनामे करण्यास टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही- खा. प्रणिती शिंदे - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, May 31, 2025

पंचनामे करण्यास टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही- खा. प्रणिती शिंदे

 पंचनामे करण्यास टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही- खा. प्रणिती शिंदे




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी गाव भेट दौरा दरम्यान मोहोळ तालुक्यातील वरकुटे, वडदेगाव गावातील गावकऱ्यांच्या भेटीगाठी घेतल्या. शेतकऱ्यांशी संवाद साधला. गाव भेट दौऱ्याला ग्रामस्थांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
आगामी काळात देखील मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबद्ध असल्याचे वचन दिले.

यावेळी बोलताना म्हणाले की, गावातील नॉन प्लॅन चे रस्ते प्लॅन घ्या म्हणून ग्रामपंचायतीने प्रस्ताव दिले तरी अधिकारी दखल घेत नाहीत त्यांचा बंदोबस्त करणार असल्याचे सांगितले. तसेच सोलापूर जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. अधिकाऱ्यांनी तातडीने पंचनामे करावीत. पंचनामे करण्यास टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही. पीक विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांचा छळ होतोय. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकारने तातडीने मदत करण्याची मागणी खासदार प्रणिती शिंदे यांनी केली आहे.

या गावभेट दौऱ्यात मोहोळ तालुका काँग्रेसचे अध्यक्ष सुलेमान तांबोळी, सोलापूर जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष राजेश अप्पा पवार, वडदेगावचे सरपंच माणिक सुरवसे, बजरंग शेंडेकर, महादेव सुरवसे, नागनाथ सुरवसे, गणेश शेंडेकर, विलास पवार, तुकाराम सुरवसे, मारप्पाा आठवले, शिवाजी सुरवसे, सौ शालन वराडे, बाळासाहेब पाटील, आरिफ पठाण, वरकुटे चे मा. सरपंच राजश्रीताई बंडगर, दत्तात्रय बचुटे, हरिदास बंडगर गुरुजी, सुभाष सोलनकर, धनाजी बसाटे, सिध्देश्वर बचुटे, सत्यवान माने, अप्पासाहेब पाटील, अलकाताई ओहोळ, सतीश बचुटे, रामभाऊ सोलनकर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages