बालाजी सरोवर प्रीमिअरच्या कोर्टयार्ड रेस्टॉरंटला ‘बेस्ट बुफे रेस्टॉरंट - नॉन-मेट्रो’ पुरस्काराने सन्मानित
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूरमधील नामांकित पंचतारांकित हॉटेल बालाजी सरोवर प्रीमिअरमधील कोर्टयार्ड रेस्टॉरंटने राष्ट्रीय स्तरावर आपली छाप पाडली आहे. फूड कॉन्नोइसर्स इंडिया अवॉर्ड्स २०२५ – वेस्ट इंडिया एडिशनमध्ये ‘बेस्ट बुफे रेस्टॉरंट - नॉन-मेट्रो’ हा मानाचा पुरस्कार या रेस्टॉरंटला प्रदान करण्यात आला.
मुंबईतील नेस्को सेंटर, बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे २१ मे २०२५ रोजी झालेल्या भव्य पुरस्कार समारंभात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार हॉटेलचे कार्यकारी व्यवस्थापक मोहनीश राणा आणि शेफ प्रमोद नाईक यांनी स्वीकारला.
या स्पर्धेत देशभरातील १,००० हून अधिक हॉटेल्स सहभागी झाली होती. त्यापैकी केवळ ८० हॉटेल्सची अंतिम फेरीसाठी निवड झाली होती. त्यात सोलापूरसारख्या मेट्रो नसलेल्या शहरातील कोर्टयार्ड रेस्टॉरंटने उत्कृष्ट कामगिरी करत प्रतिष्ठित पुरस्कार पटकावला.
स्थानिक व पारंपरिक चव, सातत्यपूर्ण सेवा आणि नवोन्मेषपूर्ण बुफे सादरीकरण यामुळे कोर्टयार्ड रेस्टॉरंटने ग्राहकांच्या मनात विशेष स्थान मिळवले आहे. सोलापूरात जागतिक दर्जाची सेवा देण्याचा प्रयत्न करणाऱ्या या रेस्टॉरंटच्या यशाचा स्थानिक पातळीवरही कौतुक होत आहे.
या यशानंतर बोलताना बालाजी सरोवर प्रिमिअरचे महाव्यवस्थापक ब्रिजेश सिंग यांनी सांगितले की, "हा पुरस्कार म्हणजे आमच्या टीमने दिवसेंदिवस केलेल्या मेहनतीचा सन्मान आहे. स्थानिक स्तरावर उत्तम सुविधा देण्याच्या आमच्या प्रयत्नांना हे मोठे प्रोत्साहन आहे.
0 Comments