'धर्मरक्षक अहिल्यादेवी होळकर एक युग' या चित्रपटाचे प्रमोशन व भव्य डान्स शो व बक्षिस वितरण सोहळा संपन्न
अकलूज (कटूसत्य वृत्त):- पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त,लय भारी प्रोडक्शन निर्मित धर्म रक्षक अहिल्यादेवी होळकर एक युग या चित्रपटाचा प्रमोशन सोहळा व साई सहारा एज्युकेशन अँड मेडिकल हेल्थ अकॅडमी अकलूज व कलामूर्ती डान्स अकॅडमी अकलूज, आयोजित डान्स मेनिया 2025 समर डान्स वर्कशॉप वॉल्यूम 5 भव्य डान्स सोहळा व प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम मूर्ती भवन अकलूज येथे पार पडला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूर जिल्हा परिषद माजी सदस्य स्वरूपाराणी जयसिंह मोहिते पाटील या उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणून सिनेअभिनेत्री अश्विनी महांगडे, यांनी कार्यक्रमात चारचांद लावले तर डॉ. कविता कांबळे, व डॉ. मानसी ईनामदार पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.
साई सहारा हेल्थ अँड एज्युकेशनल अकॅडमीच्या अध्यक्षा डॉ.श्रद्धा जवंजाळ, धर्म रक्षक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे दिग्दर्शक सुशांत सोनवले,निर्माते सोमनाथ शिंदे, त्याच सोबत सर्व चित्रपटातील कलाकार,प्रताप थोरात,अक्षय मंडलिक, दत्तात्रेय घुले, सुहास जाधव,महेश शिंदे,राहुल राजे,संदेश कदम,भूमिका पाडोळे,पूजा क्षिरसागर,राहुल लेंगरे,सुशांत गुरव, या ठिकाणी कार्यक्रमास उपस्थित होते.
0 Comments