माळशिरस तालुक्यातील १३५६ हेक्टरवरील पिकांचे नुकसान - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, May 31, 2025

माळशिरस तालुक्यातील १३५६ हेक्टरवरील पिकांचे नुकसान

 माळशिरस तालुक्यातील १३५६ हेक्टरवरील पिकांचे नुकसान


माळशिरस (कटूसत्य वृत्त):- माळशिरस तालुक्यात मे महिन्यात वादळी वारे व अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे १९५७ शेतकऱ्यांच्या १३५७.०७ हेक्टरवरील फळबाग व पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असल्याची माहिती तहसीलदार सुरेश शेजुळ यांनी दिली.


माळशिरस मंडलमधील २३१ शेतकऱ्यांचे १७३. १५ हे पिकाचे व ७१ शेतकऱ्यांचे ५६.१५ हे फळबागांचे नुकसान झाले. वेळापूर मंडलमधील १३६ शेतकऱ्यांचे १३६ हे. पिकाचे तर १०२ शेतकऱ्यांचे ७२.८ हे. फळबागांचे नुकसान झाले. महाळुंग मंडलमधील २४५ शेतकऱ्यांचे १७९.९ हे. पिकाचे तर ५३ शेतकऱ्यांचे २६.७ हे. फळबागांचे नुकसान झाले. पिलीव मंडलमधील ३८ शेतकऱ्यांचे २२.०३ हे. पिकाचे तर ३३ शेतकऱ्यांचे १७.८ हे. फळबागांचे नुकसान झाले. इस्लामपूर मंडलमधील १७  शेतकऱ्यांचे ८ हे. पिकाचे नुकसान झाले. दहिगाव मंडलमधील ३०४ शेतकऱ्यांचे १६० हे. पिकाचे तर २१ शेतकऱ्यांचे १६ हे. फळबागांचे नुकसान झाले.


अकलूज मंडलमधील २७ शेतकऱ्यांचे २४.८ हे. पिकाचे तर २० शेतकऱ्यांचे २१ हे. फळबागांचे नुकसान झाले. नातेपुते मंडलमधील २२४ शेतकऱ्यांचे १४० हे. फळबागांचे नुकसान झाले. तर ४३ शेतकऱ्यांचे २५ हे. फळबागांचे नुकसान झाले. फोंडशिरस मंडलमधील २२१  शेतकऱ्यांचे २२५ हे. पिकाचे तर १४  शेतकऱ्यांचे १० हे. फळबागांचे नुकसान झाले. खुडूस मंडलमधील ११८ शेतकऱ्यांचे ५९ हे. पिकाचे तर ३० शेतकऱ्यांचे २७.७९ हे. फळबागांचे असे एकूण १९५७ शेतकऱ्यांचे १३५६.०७ हेक्टरवरील पिकांचे व फळबागांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असल्याचे तहसीलदार शेजुळ यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages