जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर यांना राष्ट्रवादीच्या वतीने अभिवादन
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- ज्ञान-भक्ती-कर्म या त्रिसूत्रीचा मूलमंत्र देत समाजप्रबोधनाच्या माध्यमातून समतावादी विचार जनमानसात रुजवणारे महान तत्त्ववेत्ते, थोर समाजसुधारक, जगद्ज्योती, श्री संत महात्मा बसवेश्वर महाराज यांना जयंतीनिमित्त सोलापूर शहरातील महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या अश्वारूढ पूर्णाकृती पुतळ्यास राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर शहरच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी महिला अध्यक्ष संगीताताई जोगदनकर सेवादल अध्यक्ष प्रकाश जाधव जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले अल्पसंख्यांक अध्यक्ष अमीर शेख सांस्कृतिक विभाग अशितोष नाटकर वैद्यकीय अध्यक्ष बसवराज कोळी प्रज्ञासागर गायकवाड मध्य अध्यक्ष आलमिराज आबादिराजे युवक प्रदेश सचिव विशाल बंगाळे सचिन घोडके आदी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त उपस्थित होते.
0 Comments