कंबर तलाव व परिसराची संपूर्ण स्वच्छता
सोलापूर (कटूसत्य वृत्त):-सोलापूर महानगरपलिकेच्या वतीने दि. ३० एप्रिल, २०२५ आयुक्त यांच्या आदेशानुसार घनकचरा व्यवस्थापन विभाग अंतर्गत भाग क्र. ७ कडील चतुर्थ श्रेणी कर्मचा-यांनाकडून सकाळच्या वेळेत कंबर तलाव व परिसराची संपूर्ण झाडलोट व स्वच्छता करण्यात आली. त्यावेळी तलावाच्या संपूर्ण काठावर असलेल्या भागातील कचरा, प्लास्टिक, निर्माल्य इत्यादी काढून स्वच्छता करण्यात आली. तसेच बुकिंग ऑफिस परिसर, झाशीच्या राणीच्या पुतळ्याचा परिसर, खाद्य पदार्थ परिसर या संपूर्ण भागाची स्वच्छता करण्यात आली व संपूर्ण कचरा काढून घंटागाडीव्दारे तेथून सर्व कचरा हलविण्यात आला. या कामकाजामध्ये सातत्य ठेवणेबाबत अतिरिक्त आयुक्त रवि पवार यांनी आरोग्य निरीक्षक व मुख्य आरोग्य निरीक्षक यांना जरूर त्या सूचना दिल्या. सदर सफाईचे कामकाज हे ९ ते १०.३० या वेळेत अतिरिक्त आयुक्त रवि पवार यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यावेळी मुख्य सफाई अधिक्षक नागनाथ बिराजदार, मुख्य आरोग्य निरीक्षक नागनाथ मेंडगुळे व संबधित आरोग्य निरीक्षक त्यांचे कर्मचा-यांसह उपस्थित होते.
ReplyForward |
0 Comments