कांदळवनात उद्योग व्यवसाय करून आपली प्रगती साधा- डॉ. जयपाल पाटील
अलिबाग (कटूसत्य वृत्त):- आपल्या गावा शेजारील असलेल्या खाडी मधील कांदळ वनात शेतकऱ्यांच्या उपजीविकेसाठी खेकडे पालन, कालवा शेती, पिंजऱ्यातील मत्स्य शेती, निसर्ग पर्यटन उद्योग व्यवसाय करून आपली आर्थिक बाजू मजबूत करू शकता यासाठी प्रत्येकाने कांदळ वनाचे संरक्षण आणि सर्वर्धन केलेच पाहिजे.कांदळवनाचे जर नुकसान केले 5 वर्षाची शिक्षा आणि1 लाख 50रुपये दंड करण्याची तरतूद आहे. यासाठी खाडी किनारी रहात असलेल्या शेतकरी मच्छिमार आणि नागरिकांनी असलेल्या कांदळवणाचा वापर योग्य प्रकारे करावा. असे मार्गदर्शन ग्रामपंचायत सूडकोली यांनी आयोजित केलेल्या आपत्ती सुरक्षा कार्यशाळेत डॉ. जयपाल पाटील यांनी सांगितले.यावेळी व्यासपीठावर प्रशाशक हेमा वायरे, डॉ. जयपाल पाटील, ग्रामविकास अधिकारी दर्शन धुमाळ, डॉक्टर रोशन पाटील,अध्यक्ष संयुक्त वन प्रशासन नामदेव तांबडकर, वनाधिकारी संतोष पठारे,वनाधिकारी अजय कुचेकर वनाधिकारी भूपेंद्र सूर्यवंशी मुख्याध्यापक पी. डी. पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.प्रारंभी सर्व पाहुण्यांचे स्वागत प्रशासक व ग्राम विकास अधिकारी पुष्पगुच्छ देऊन केले. तर संविधान वाचन करून कार्यक्रमास सुरुवात झाली, सुरुवातीला विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्व या विषयावर रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रमुख डॉक्टर रोशन पाटील यांनी केले. त्यानंतर डॉ. जयपाल पाटील यांनी अपघातासाठी 108 रुग्णवाहिका, मुलींच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र पोलिसांचा 112 क्रमांक, बाळंतपणाला महिलांना रुग्णालयात नेण्यासाठी 102 रुग्णवाहिकेचा वापर कसा करायचा याचे प्रात्यक्षिक देताना प्राथमिक आरोग्य केंद्र रेवदंडा येथून चालक अक्षय रुग्णवाहिका घेऊन पोहोचले. यावेळी रुग्ण आणि ज्येष्ठांना रुग्णवाहिकेपर्यंत कसे न्यायचे याचे हाताची घडी गणपती बाप्पा सादरीमध्ये नेण्याचे प्रत्यक्ष दाखविण्यात आले. यात्रा अगर प्रवासा मध्ये जर आपण चुकलो तर पोलीस काका अथवा पोलीस मावशी यांच्या जवळच जाऊन सुरक्षित राहण्यासाठी आपल्या बाबा आईचा मोबाईल नंबर त्यांना सांगावा असे मुलांना सांगितले. गावाशेजारी जंगलात आग लागली तर या क्रमांकावर फोन करावा, काही वेळातच वन अधिकारी भूपेंद्र सूर्यवंशी आग विझवण्याचे मशीन घेऊन पोहोचतात व आग विझवण्याचे प्रत्यक्ष देतात. आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रमासाठी आशा वर्कर रंजना गायकर, आपत्ती सुरक्षा मित्र विकास रणपिसे, वासुदेव दिवकर दत्ताराम पाटील, शैलेश टक्के,ग्रामपंचायत कर्मचारी सर्वोदय विद्यालयाचे, रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेचे शिक्षक यांनी खूप परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारत चौधरी यांनी केले. आभार प्रदर्शन ग्रामविकास अधिकारी दर्शन धुमाळ यांनी मानले.
0 Comments