उपजिल्हा रुग्णालय पंढरपुर येथे कॅन्सर डायग्नोस्टीक व्हॅनचा उदघाटन सोहळा संपन्न
.jpg)
पंढरपुर (कटूसत्य वृत्त):- असंसर्गजन्य रोग कार्यक्रम अंतर्गत ग्रामीण व शहरी भागातील संशयित कर्करोग रुग्णांची तपासणी व निदान करण्यासाठी अत्याधुनिक सोयींनी युक्त अशा कॅन्सर डायग्नोस्टीक व्हॅनचे उदघाटन माढा मतदारसंघाचे विधानसभा सदस्य अभिजीत पाटील व पंढरपुरचे उपविभागीय अधिकारी सचिन इथापे यांचे हस्ते करण्यात आले.
सोलापुर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने यांचे मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रमास
अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. क्षिरसागर, जिल्हा रुग्णालयाचे निवासी वैद्यकिय अधिकारी
डॉ.एस.पी.कुलकर्णी,जिल्हा मौखिक अधिकारी डॉ. रोहन वायचळ, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक डॉ. महेश सुडके, दंतचिकित्सक डॉ. प्रसन्न भातलवंडे, डॉ. रुचा वैद्य, डॉ. प्रबंध भिसे, डॉ. महेश माने, डॉ. विजयकुमार सरडे, डॉ. रोंगे मॅडम, डॉ. वर्षा काणे मॅडम, डॉ. प्रदीप केचे, डॉ. चारुदत्त शितोळे, डॉ. बालाजी बिराजदार तसेच नर्सोंग स्टाफ, पॅरामेडीकल स्टाफ उपस्थित होते.
सदरील कॅन्सर डायग्नोस्टीक व्हॅनच्या माध्यमातुन बुधवार दिनांक ३० एप्रिल रोजी
दिवसभर येणाऱ्या रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली. यामध्ये ३० वर्षापुढील एकुण २११
रुग्णांची कर्करोगाची तपासणी करण्यात आली . यापैकी मुख कर्करोगाची तपासणी करण्यात
आलेल्या एका मुख कर्करोग संशयित रुग्णांची बायोप्सी घेण्यात आली. ९५ स्त्री रुग्णांची
गर्भाशय मुख कर्करोगाची व स्तन कर्करोगाची तपासणी करण्यात आली यापैकी ३५ स्त्री
रुग्णांची व्हीआयए तपासणी करण्यात आली.यावेळी आमदार अभिजीत आबा पाटील यांनी उपजिल्हा रुग्णालय पंढरपुरच्या आरोग्य कामकाजाची माहिती घेऊन कौतुक केले.
सदरील कॅन्सर डायग्नोस्टीक व्हॅन ही पंढरपुर शहर व तालुक्यात फिरणार असुन गरजु
रुग्णांनी शासनाच्या उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन डॉ. महेश सुडके यांनी यावेळी केले.
0 Comments