Hot Posts

6/recent/ticker-posts

नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करणे हे आमचे कर्तव्य- किसन जाधव

 नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करणे हे आमचे कर्तव्य- किसन जाधव





सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर महानगरपालिका नागरी स्थानिक स्वराज्य संस्था परिक्षेत्रात अधिसूची विशिष्ट नागरिक सेवा व सुविधा पुरविणे २०२४-२५ अंतर्गत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या सहकार्यातून कार्यसम्राट नगरसेवक नागेश अण्णा गायकवाड आणि किसन जाधव यांच्या विशेष प्रयत्नातून प्रभाग क्रमांक २२ येथील लिमयेवाडी व अंतर्गत परिसरात १९ लाख ४८ हजार ६३९ रुपये खर्चित ड्रेनेज लाईन कामाचे शुभारंभ करण्यात आले. ड्रेनेज लाईन उद्घाटन सोहळ्याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड, नितीन जाधव, दीपक जाधव, किशोर जाधव,अनिल गायकवाड, अशोक पुजारी जाधव, प्रवीण जाधव, बाळकृष्ण जाधव, अनुप उपाडे, अंबादास गायकवाड, शिवा जाधव, सिद्धार्थ जाधव,कमलाबाई गायकवाड,रेश्मा जाधव, सुनीता मावशी,भाग्यलक्ष्मी ताई,गंगुबाई जाधव,रेखा जाधव, सोनाली जाधव, नसरीन पटेल, रसिका कसबे,सुरेखा गायकवाड, सरस्वती गायकवाड, ज्योती गायकवाड, स्नेहल जाधव, सरिता शर्मा, रेणू गायकवाड, मंगल गायकवाड, विद्या डेविड, गीता जाधव, कोमल उपाडे, गंगाबाई उपाडे, लता जाधव, अनिता माने, नयुमा शेख,रमजान शेख, जुबेदा शेख, मदिना शेख,सुधा गायकवाड, अंबाबाई जाधव आदींच्या उपस्थितीत या ड्रेनेज लाईन कामाचा शुभारंभ करण्यात आला दरम्यान यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव म्हणाले की प्रभाग क्रमांक २२ येथील नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करणे हे आमचे कर्तव्य आहे आणि  ड्रेनेज कामामुळे परिसरातील आरोग्य आणि स्वच्छता निश्चितच सुधारणार आहे या विकास कामासाठी सहकार्य करणाऱ्या प्रभागातील रहिवाशांचे आभार सर्वांच्या एकत्रित प्रयत्नामुळेच आज या कामाचा शुभारंभ होत आहे आणि लवकरच हे काम पूर्णत्वास जाईल अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी दिली. या ड्रेनेज लाईनचे काम पूर्ण झाल्यावर या परिसरातील सांडपाण्याची योग्य व्यवस्था होणार असून प्रभाग क्रमांक २२ येथील नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून येणार आहे या विकास कामामुळेच नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे यावेळी किसन जाधव म्हणाले. या ड्रेनेज लाईन शुभारंभ प्रसंगी प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Reactions

Post a Comment

0 Comments