शिष्यवृत्ती परीक्षेत गुलमोहोर इंग्लिश स्कुलचे यश
माळीनगर(कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्या मार्फत आयोजित केलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत येथील गुलमोहोर इंग्लिश मिडीयम स्कुल माळीनगरचे इ.५ वी तील ६ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे.
यामध्ये इ.५ वी तील विद्यार्थी १) स्वरा कुणाल एकतपुरे १८४ गुण, २) स्वराक्षी कौस्तुभ पोतदार १८० गुण, ३) आराध्या संदीप गिरमे १४६ गुण, ३) विश्लेषा विशाल सरतापे १४६ गुण, ४) तेजश्री गणेश उंबरदंड १३८ गुण, ५) राजकन्या हनुमंत महाडिक पाटील १२६ गुण, ६) गुरुराज आबासाहेब पालवे १२४ गुण मिळवून शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरले आहेत.
शिष्यवृत्ती परीक्षेतील सर्व पात्र विद्यार्थी,विद्यार्थिनींचा संस्थेतर्फे व स्कुलतर्फे दि सासवड माळी एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी अजय गिरमे यांचे हस्ते भेटवस्तू व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास स्कुलचे प्रिन्सिपल वसंत आंबोडकर,तसेच पालक,शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.या विद्यार्थ्यांना सहशिक्षिका सपना भेंडीगेरी,सीमा जाधवर,प्रफुल्ल मुसळे यांचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन राजेंद्र गिरमे,व्हा.चेअरमन नितीन इनामके,सेक्रेटरी अजय गिरमे,खजिनदार ज्योतीताई लांडगे,संचालक अशोक गिरमे,अनिल रासकर,ऍड.सचिन बधे,डॉ.अविनाश जाधव,रत्नदीप बोरावके, कल्पेश पांढरे,पृथ्वीराज भोंगळे,दिलीप इनामके, संचालिका लीनाताई गिरमे व विश्वस्त मंडळ यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
0 Comments