Hot Posts

6/recent/ticker-posts

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त एकदिवसीय कार्यशाळा- शितलदेवी मोहिते पाटील

 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त एकदिवसीय कार्यशाळा- शितलदेवी मोहिते पाटील




अकलूज (कटूसत्य वृत्त):- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची त्रिशताब्दी जयंती निमित्त, PM USHA योजनेअंतर्गत एकदिवसीय नवउद्योजक मार्गदर्शन व कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती. शिवरत्न शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा सौ शितलदेवी धैर्यशील मोहिते पाटील यांनी दिली

हा उपक्रम पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, शिवरत्न इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, ग्रीनफिंगर्स कॉलेज ऑफ कॉम्प्युटर अॅन्ड टेक्नॉलॉजी, विजयसिंह मोहिते-पाटील कॉलेज ऑफ नर्सिंग, रोटरी क्लब सराटी डिलाईट, राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळ (NSIC) आणि सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालय (MSME) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येत आहे.

शिवरत्न शिक्षण संस्था व शिवपार्वती विकास व सेवा ट्रस्ट यांचे वतीने मा आ रणजितसिंह मोहिते पाटील व मा खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शना खाली आयोजित होते असलेल्या या कार्यशाळेत  मार्गदर्शन करण्यासाठी थायलंड सरकारच्या अर्थमंत्रालयाचे वाणिज्य सल्लागार चेतन नरके,  ‘टू ब्रदर्स कंपनी’चे सत्यजित हांगे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विदयापिठाचे प्र कलगुरू डॅा दामा, कौशल्य विकास व पी एम उषा योजनेचे संचालक डॅा प्रभाकर कोळेकर, एम एस एम ई चे श्री खुजनारे, श्री मिलींद बारापत्रे, श्री रितेश रंगारी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रम दिनांक 2 मे २०२५ रोजी सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत, शंकरनगर-अकलूज येथील सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील स्मृतीभवनात पार पडणार आहे.

या कार्यशाळेत नवोदित आणि होतकरू उद्योजकांना व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रशिक्षण, शासकीय अर्थसहाय्य योजना, आधुनिक तंत्रज्ञान, व्यवसाय विस्तार, रोजगार निर्मिती आणि राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संधी यासंदर्भात सखोल मार्गदर्शन मिळणार आहे. बचतगट आणि ग्रामीण उद्योगांना विशेष प्रोत्साहन देण्यात येणार आहे.

या उपक्रमामुळे तरुणांना नव्या संधी मिळून उद्योजकतेसाठी योग्य दिशा मिळेल, असा विश्वास शिवामृत दूध संघाचे चेअरमन व शिवरत्न शिक्षण संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी व्यक्त करीत इच्छुक उद्योजकांना या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments