विहूर रस्त्यावरील शेकडो वर्षे जुनी झाडे धोकादायक - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, May 30, 2025

विहूर रस्त्यावरील शेकडो वर्षे जुनी झाडे धोकादायक

 विहूर रस्त्यावरील शेकडो वर्षे जुनी झाडे धोकादायक



मुरुड (कटूसत्य वृत्त):- अलिबाग -मुरुड रस्त्यावर मोरे ते विहूर पेट्रोल पंप दरम्यान शेकडो वर्षे जुनी असलेली झाडे धोकादायक स्थितीत असून प्रवाशांना जीवघेणा प्रवास करावा लागतो आहे.नुकत्याच झालेल्या वादळी वाऱ्यासह जोरदार पावसानंतर मान्सूनच्या पावसाचे आगमन लक्षात घेऊन संबंधित बांधकाम खात्याने यात तातडीने लक्ष पुरवून योग्य ती उपाययोजना करण्याची मागणी वाहनचालक, प्रवासी व नागरिकांतून करण्यात येत आहे.
     गेली दोन तीन दिवस मुरुडमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने थैमान घातले.तालुक्यात या पावसाने लाखोंचे नुकसान झाले.जोरदार पावसाचा परिणाम अलिबाग -मुरुड रस्त्यावर मोरे ते विहूर पेट्रोल पंप दरम्यान तीन दिवसांपूर्वी शेकडो वर्षे जुने असलेले महाकाय वडाचे झाड पडून तीन ते चार तास वाहतूक पुर्णपणे ठप्प झाली होती.आज या रस्त्यावर शेकडो वर्षे जुनी असलेली काही झाडे धोकादायक स्थितीत आहेत.वेळप्रसंगी संभाव्य अपघात,जिवित व वित्त हानीची शक्यता लक्षात घेऊन सदर झाडाच्या फांद्या व पारंब्या छाटणे अत्यंत आवश्यक आहे.
  मुरुडच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मागील डिसेंबर महिन्यात साळाव -मुरुड रस्ता प्र.रा.मा.-४ हा महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाकडे वर्ग झाल्याचे समजते.तरी शासनाच्या संबंधित बांधकाम खात्याने यात तातडीने लक्ष पुरवून योग्य ती उपाययोजना करण्याची मागणी वाहनचालक प्रवासी व नागरिकांतून जोर धरीत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages