*नेताजी प्रशालेस मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा पुरस्कार प्रदान*
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- नीलम नगर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस प्रशालेस पंचायत समिती उत्तर सोलापूर गटशिक्षणाधिकारी कार्यालयाच्यावतीने 'मुख्यमंत्री माझी शाळा व सुंदर शाळा' या अभियानांतर्गत आयोजित उपक्रमातून तृतीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाला.
सिंहगड इंजिनिअरिंग कॉलेज येथे झालेल्या कार्यक्रमात शिक्षणाधिकारी कादर शेख, उपशिक्षणाधिकारी स्वाती हवेले, गटशिक्षणाधिकारी सिद्धेश्वर निंबर्गी, गटविकास अधिकारी बाबासाहेब पाटील, विस्तार अधिकारी बापूराव जमादार ,शिक्षक संघटनेचे नेते ज.रा. मोरे ,वडाळ्याचे सरपंच राजेंद्र साठे आदी मान्यवरांच्या हस्ते मुख्याध्यापक रविशंकर कुंभार व पर्यवेक्षक गौरीशंकर आळंगे यांना सन्मान चिन्ह, शाल श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी प्रशालेचे सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.
सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात दुसऱ्या टप्प्यातील मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानाअंतर्गत आयोजित विविध उपक्रमांच्या स्पर्धेत प्रशालेने सहभाग घेतला. शासनाने आखून दिलेल्या शैक्षणिक गुणवत्ता, आरोग्याची स्वच्छता, पर्यावरण, क्रीडा, शालेय प्रशासन, भौतिक सुविधा, सांस्कृतिक सहभाग आदी निकष प्रभावीपणे राबविल्याने हा पुरस्कार मिळाला.
पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थाध्यक्ष अण्णाराव कुंभार, खजिनदार ललिता कुंभार, मुख्याध्यापिका विजयालक्ष्मी कुंभार, मुख्याध्यापिका वैशाली कुंभार, मुख्याध्यापक ज्ञानेश्वर म्हेत्रे आदींनी सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
0 Comments