जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार
सोलापूर, (कटूसत्यवृत्त):-महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 66 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते गुरुवार, दिनांक 1 मे 2025 रोजी सकाळी 7.10 वाजता ध्वजारोहण होणार आहे. तरी जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी विहित वेळेच्या पंधरा मिनिटे अगोदर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात राष्ट्रीय पोशाखात उपस्थित राहावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांनी केले आहे.
0 Comments