Hot Posts

6/recent/ticker-posts

भीम प्रतिष्ठानचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

 भीम प्रतिष्ठानचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर




विविध क्षेत्रातील 9 जणांचा होणार सन्मान

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- भीम प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. शनिवार दि. 5 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता हुतात्मा स्मृती मंदिरात पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती संस्थापक बाबा बाबरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
        भीम प्रतिष्ठान या संस्थेचे हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. प्रतिष्ठानच्या वतीने गेली 25 वर्षात विविध सामाजिक, शैक्षणिक उपक्रम राबविले आहे. विद्यार्थी दत्तक योजनेतून अनेक विद्यार्थी घडले आहेत. दरवर्षी भीम प्रतिष्ठानच्या वतीने विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात येते.
       यंदाचा पुरस्कार वितरण समारंभ राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष एड. धर्मपाल मेश्राम यांच्या हस्ते आणि महापालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस उपायुक्त विजय कबाडे, पोलीस उपायुक्त डॉ. दिपाली काळे, विवेक विचार मंचचे संयोजक सागर शिंदे, जिल्हा परिषदेचे पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी , शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष अमोल शिंदे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. याप्रसंगी उद्योजक पदमचंद राका , राजेंद्र शहा - कासवा, डॉ. शिवाजीराव पवार, डॉ. उदय वैद्य, सुजीत कदम, प्रा. विक्रम कांबळे, दत्ता गायकवाड, देवेंद्र मोरे, धर्मेंद्र माने आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाहीर दीपक कांबळे यांचा भीम गीतांचा कार्यक्रम होणार आहे. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्ष वीरेंद्र हिंगमिरे यांनी केले आहे.
      या पत्रकार परिषदेस अकबर शेख, सिद्धांत बाबरे, ऍड. विशाल मस्के, स्वाती मस्के उषा चव्हाण आदी उपस्थित होते.

हे आहेत यंदाच्या पुरस्काराचे मानकरी

यंदाच्या वर्षी उद्योजक महादेव कोगनुरे (सामाजिक पुरस्कार), संपादक प्रशांत माने (पत्रकारिता पुरस्कार), रवी बापटले (विशेष गौरव पुरस्कार), प्रा. नानासाहेब गव्हाणे (गौरव पुरस्कार), राखी देशमाने (शैक्षणिक), राहुल बनसोडे (कामगार पुरस्कार), उमाकांत गायकवाड ( क्रीडा पुरस्कार), दिगंबर भगरे (सन्मानपत्र), विनोद माने (सन्मानपत्र) आदी मान्यवरांना मान्यवरांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. सन्मान चिन्ह, सन्मानपत्र, शाल व पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments