टेंभुर्णी येथील शितल ज्वेलर्सचे संजयमामा शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन
टेंभूर्णी (कटूसत्य वृत्त):- कोठारी बंधुंनी अतिशय निष्ठेने, जिद्दीने व अथक परिश्रम करून एका दुकानाची तीन अद्ययावत दुकाने केली आहेत. टेंभुर्णीची सध्या चौफेर प्रगती होत आहे. अशात कोठारी यांची ही सोन्याची दुकाने टेंभुर्णीच्या वैभवात भर घालणारी आहेत, असे प्रतिपादन माजी सभापती विक्रमसिंह शिंदे यांनी केले.
गुरुवारी (दि. २७) टेंभुर्णी येथील शितल ज्वेलर्स या नूतन भव्य शोरूमचे उद्घाटन माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. प्रास्ताविक विजयकुमार कोठारी यांनी केले. यावेळी शिवसेनेचे संजय कोकाटे, शिवाजी कांबळे, भाजपचे तालुकाध्यक्ष योगेश बोबडे यांनी आपल्या भाषणातून कोठारी बंधुंनी उभारलेल्या शितल ज्वेलर्स या दालनाला शुभेच्छा दिल्या.
प्रारंभी विजयकुमार कोठारी, संजयकुमार कोठारी, राजेंद्रकुमार कोठारी, चेतन कोठारी, शुभम कोठारी, सन्मुख कोठारी, प्रसाद कोठारी यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत केले.
यावेळी खरेदी-विक्री संघाचे
चेअरमन तुकाराम ढवळे, रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष प्रा. सुहास पाटील, माजी संचालक बाळासाहेब ढवळे, माजी सरपंच प्रमोद कुटे, पोलीस निरीक्षक दीपक पाटील, बँक रिजनल हेड सोलापूर राजीव दुबे, पंढरपूर मर्चेंट बँकेचे चेअरमन शितल तांबोळी, राजूशेठ शेटे, सुधीर तेली, सराफ सुवर्णकार असोसिएशनचे अध्यक्ष शिरीष कटेकर, महावीर
गांधी, नागेश भोसले, शिवसेनेचे तालुकाप्रमुख मधुकर देशमुख, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दिलीप भोसले, रमेश पाटील, उपसरपंच सतीश नेवसे, रोहित देशमुख, दत्तात्रय ढवळे, जयवंत पोळ, संचालक सचिन देशमुख, अॅड. मंगेश देशमुख, संतोष खटके, मार्केट कमिटीचे नागेश खटके-पाटील, औदुंबर महाडिक, गोरख खटके, बेंबळेचे यशवंत भोसले, बलभीम लोंढे, विलास देशमुख, प्रकाश पाटील, डॉ. राहुल पाटील, महेंद्र वाकसे, प्राचार्य महेंद्र कदम, विजय खटके,
महेश कोठारी, भीमराव भरगंडे, मनोज काळे, सोमनाथ महाडिक उपस्थित होते.
सूत्रसंचालन राजेंद्र मुळे यांनी केले. आभार राजेंद्रकुमार कोठारी यांनी मानले.
0 Comments