Hot Posts

6/recent/ticker-posts

खंडोबाचीवाडी येथील ग्रामदैवत खंडोबा यात्रेला सुरुवात

 खंडोबाचीवाडी येथील ग्रामदैवत खंडोबा यात्रेला सुरुवात





मोहोळ (कटूसत्य वृत्त):- खंडोबाचीवाडी सालाबाद प्रमाणे याही वर्षी अनगर पंचक्रोशीतील प्रसिद्ध असलेल्या खंडोबाचीवाडी गावच्या ग्रामदैवत खंडोबा यात्रेनिमित्त यात्रा कमिटी व ग्रामस्थांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात्रेला सुरुवात ११ एप्रिल रोजी शुक्रवारी सायंकाळी ८:०० वाजता श्री खंडोबा आणि म्हाळसा व बानू लग्न सोहळा या कार्यक्रमाने होणार आहे. याच दिवशी यात्रेनिमित्त रात्री ९:३० स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर रात्रभर वाघ्या मुरळीचा कार्यक्रम होणार आहे. यात्रेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी १२ एप्रिल रोजी सकाळी ७:०० वाजता लंगर मिरवणूक, ९:०० वाजता लंगर तोडण्याचा कार्यक्रम, दुपारी १२:०० वाजता श्री खंडोबा देवास नैवेद्य अर्पण करणे, रात्री ९:०० वाजता देवाचा पारंपरिक छबिना आणि विविध सोंगाचा कार्यक्रम तसेच रात्री बारा वाजता लावण्य मदन मंजिरी ऑर्केस्ट्रा होणार आहे. तिसऱ्या दिवशी रविवारी १३ एप्रिल रोजी सायंकाळी चार वाजता जंगी कुस्त्या व व रात्री नऊ वाजता कुमारी कमल अनिता कराडकर लोकनाट्य तमाशा मंडळाचा कार्यक्रम होणार आहे. ग्रामस्थांच्या वतीने मोठ्या भक्ती भावाने व श्रद्धेने ग्रामदैवत खंडोबा यात्रा काळात धार्मिक विधीचे विविध कार्यक्रम केले जातात. नोकरी कामानिमित्त परगावी असलेले गावातील नागरिक देखील याच्यासाठी आवर्जून उपस्थित असतात. धार्मिक सोहळा व मनोरंजनाचे कार्यक्रम पाहण्यासाठी अनगर व पंचक्रोशीतील नागरिक देखील संख्येने उपस्थित राहतात. यावर्षीच्या यात्रेतील विविध कार्यक्रम पाहण्यासाठी भाविकांनी उपस्थित राहावे, असे अहवान श्री खंडोबा यात्रा कमिटी खंडोबाची वाडी यांच्या वतीने करण्यात आले आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments