कोकाटेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा
ठाकरे शिवसेनेच्या वतीने आंदोलन : काळे फासण्याचा इशारा
सोलापूर (कटुसत्य वृत्त):- शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या माध्यमातून क्रूर चेष्टा करणारे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, या मागणीसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने जिल्हाप्रमुख संतोष पाटील यांच्या नेतृत्वाखाली रविवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये निदर्शने करण्यात आली.
कोकाटे यांनी शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा केली आहे. राज्यातील शेतकरी बांधवांचा अवमान केला आहे. कोकाटे यांच्या निषेधार्थ राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. ठाकरे शिवसेनेच्या वतीने राज्यभर आंदोलन केले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून सोलापूर शहर शिवसेनेच्या वतीने आंदोलन केले. यावेळी ठाकरे सेनेचा विजय असो, कृषिमंत्र्यांचा जाहीर निषेध असो, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचा निषेध असो, शिवसेना जिंदाबाद, शिवसेनेचा विजय असो, कोकाटे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी झालीच पाहिजे, अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला होता.
महाविकास आघाडीच्या सरकारच्या माध्यमातून शिवसेनेने यापूर्वी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली होती. मात्र, या सरकारला शेतकऱ्यांचे कसलेच देणे-घेणे नाही. त्यामुळे कर्जमाफीपासून अनेक शेतकरी वंचित असल्याची टीका यावेळी शिवसैनिकांनी केली.
या आंदोलनात शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष पाटील, युवा सेना युवा अधिकारी बालाजी चौगुले, उपजिल्हाप्रमुख खंडू सलगरकर, रवि घंटे, सचिन माने, रमेश चौगुले, संगप्पा कोरे, संतोष घोडके, प्रकाश पवार, सखाराम वाघ, अनिल ननवरे, रवी कोळी, विकास डोलारे, रवी डोके, विश्वजित चौगुले,
किरण मिश्रा, प्रशांत पाटील, विठ्ठल कदम उपस्थित होते.
चौकट १
कृषिमंत्री कोकाटे यांनी शेतकऱ्यांचा अवमान केला आहे. त्यामुळे त्यांना कृषिमंत्री पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही. त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अन्यथा त्यांच्या तोंडाला काळे फासू.- संतोष पाटील, जिल्हाप्रमुख, उबाठा शिवसेना
One attachment • Scanned by Gmail
0 Comments