Hot Posts

6/recent/ticker-posts

शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर व्हावा – बाबुराव गायकवाड

 शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर व्हावा – बाबुराव गायकवाड



        

 

सांगोला (कटूसत्य वृत्त):- पारंपरिक पध्दतीने शेती केल्यास शेती तोटयात जाते. शेतक-याचा शेतीमध्ये नव-नवीन प्रयोग करण्यात वेळ, पैसा व श्रम वाया जातो. पिकातील फायदा-तोटा विचारात घेवून शेतक-यांनी पीक पध्दतीमध्ये बदल करणे काळाजी गरज आहे, हे स्पष्ट करुन सुशिक्षित तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता, शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यास, पाण्याची बचत होवून शेती फायदयाची ठरेल असा आशावाद एकविसाव्या महाराष्ट्र सिंचन परिषदेचे स्वागताध्यक्ष तथा सांगोला तालुका उच्च शिक्षण मंडळाचे अध्यक्ष बाबुराव(भाऊ) गायकवाड यांनी व्यक्त केला.    

      येथील सांगोला महाविद्यालयामध्ये महाराष्ट्र सिंचन सहयोग या संस्थेच्या वतीने आयोजित एकविसाव्या महाराष्ट्र सिंचन परिषदेच्या समारोप समारंभ प्रसंगी ते बोलत होते.  यावेळी महाराष्ट्र सिंचन सहयोग संस्थेचे अध्यक्ष डॉ.दि.मा.मोरे, संस्था सचिव ॲड.उदय(बापू) घोंगडे, सहसचिव साहेबराव ढेकळे, माजी सचिव महादेव झिरपे, निमंत्रित कार्यकारणी सदस्य्‍ सुरेश फुले, प्राचार्य डॉ.सुरेश भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.

      “हवामानातील दोलायमानता आणि सिंचन व्यवस्थापन” या विषयावरील दोन दिवसीय राज्यस्तरीय सिंचन परिषदेमध्ये दुस-या दिवशी ( दि.६ एप्रिल) रोजी शेती फळबागांची या विषयावर डॉ. आप्पासाहेब पुजारी, डॉ. विलास शिंदे (कोल्हापूर), प्रभाकर चांदणे (सांगोला), सुधाकर चौधरी (सिंधखेडराजा), यांनी मागदर्शन केले.  उदयोजिका स्नेहल लोंढे (कवठेमहांकाळ) यांनी आपली यशोगाथा सांगितली. प्रताप चिपळूणकर (कोल्हापूर), डॉ. मच्छिद्र सोनलकर, रमेश जवळगे (लातूर), सुधीर भोंगळे, शहाजी गडडिरे, वैजिनाथ घोंगडे, सतिश देशमुख, दत्तात्रय हराळे, रामेश्वर मांडके, प्रा.प्रसाद लोखंडे, कु.सृष्टी शिंदे यांनी आपले उदयोग आणि शेती क्षेत्रातील अनुभव सांगत परिषदेतील शेतक-यांना मार्गदर्शन केले.

सिंचन परिषदेत तज्ञांनी या केल्या शिफारशी –

·                     शासनाने नदी खोरे विकास महामंडळे स्वायत्त्‍ करावीत.

·                     राज्यातील धरणातील गाळ काढून पाणी साठवण क्षमता वाढवावी.

·                     राज्यातील शहरांचा होणारा अनियोजित विस्तार थांबवावा.

·                     बांधकाम परवाना देताना पिण्याच्या पाण्याची सुविधेचा विचार घ्यावी.

·                     अकृषीकरणाचा विनाकारण घाट घालू नये.

·                     ग्रामीण भागात शेतीबाहय रोजगाराची निर्मिती करावी.

·                     शहाराकडे होणारे लोकसंख्या स्थलांतर थांबवावे.

·                     तिसरी मुंबई निर्मिती थांबवावी.

·                     शहरामध्ये बेरोजगारी, ग्रामीण भागात मजुरांचा तुडवडा हा प्रश्न्‍ शासनाने सोडवावा.

·                     शासनाने सवंग लोकप्रियतेच्या योजना बंध कराव्यात त्यामुळे लोकांचा आळशीपणा वाढत      आहे.

 

      कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्र.प्राचार्य डॉ. सुरेश भोसले यांनी केले. यावेळी सिंचन सहयोगच्या वतीने विदयार्थी,शिक्षकेतर कर्मचारी व प्राध्यापक यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संस्था निमंत्रित कार्यकारणी सदस्य्‍ शामराव लांडगे, संस्था सदस्य दिनानाथ लोखंडे, राज्यभरातून आलेले तज्ञ, शेतकरी, विदयार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रशांत आडे, प्रा. संतोष कांबळे यांनी केले. आभार संस्था सचिव अॅड.उदय(बापू) घोंगडे यांनी मानले.

      या दोन दिवसीय परिषदेमध्ये सद्गुरु एंटरप्रायजेस (सांगली), जैन इरिगेशन लि.(जळगांव), माता बालक उत्कर्ष् प्रतिष्ठान (सांगोला), तेजस प्रकाश (कोल्हापूर), गोदावरी पब्लिकेशन (नाशिक), युनिक फाऊंडेशन प्रकाशन (पुणे), महाराष्ट्र सिंचन सहयोग (छ.संभाजीनगर) यांनी  लावलेल्या स्टॉलला शेतक-यांचा व विदयार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

 या परिषदेसाठी महाराष्ट्र सिंचन सहयोगचे अध्यक्ष डॉ. दि. मा. मोरे, कोषाध्यक्ष सुयश देहडकर, सुधाकर चौधरी, समन्वयक प्रशांत आडे, परिषदेचे स्वागताध्यक्ष बाबुराव(भाऊ) गायकवाड, उपाध्यक्ष तात्यासाहेब केदार, उपाध्यक्ष प्रा. पी.सी.झपके, खजिनदार नागेश गुळमिरे, सचिव ॲड.उदय(बापू) घोंगडे, सहसचिव साहेबराव ढेकळे, संस्था सदस्य डॉ. संजिवनी केळकर, संस्था सदस्य विश्वनाथ चव्हाण, संस्था सदस्य सोमनाथ ढोले, संस्था सदस्य रावसाहेब ताठे, माजी सचिव महादेव झिरपे, निमंत्रित कार्यकारणी सदस्य् शामराव लांडगे, निमंत्रित कार्यकारणी सदस्य्‍ सुरेश फुले,  प्रभारी प्राचार्य डॉ.सुरेश भोसले, यांचेसह दोन्ही संस्थेचे पदाधिकारी यांचे मागदर्शनाखाली प्राध्यापक,  शिक्षकेत्तर कर्मचारी, विदयार्थी  व  शेतकरी यांनी परिषदेसाठी परिश्रम घेतले.
Reactions

Post a Comment

0 Comments