Hot Posts

6/recent/ticker-posts

शिक्षक बाळासाहेब जमाले यांच्या मराठी उतारे पुस्तकाचे प्रकाशन

 शिक्षक बाळासाहेब जमाले यांच्या मराठी उतारे पुस्तकाचे प्रकाशन




कसबे तडवळे (कटूसत्य वृत्त):- 6 एप्रिल 2025 रोजी रामनवमीचे औचित्य साधून जिल्हा परिषद आदर्श केंद्रीय प्राथमिक शाळा कसबे तडवळे येथील शिक्षक बाळासाहेब जमाले यांच्या मराठी उतारे या नवोदय व शिष्यवृत्तीसाठी उपयुक्त असलेल्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. सदरील पुस्तकाचे प्रकाशन रामचंद्र महाराज महंत राम मंदिर कसबे तडवळे,ज्येष्ठ विधीज्ञ पी.आर.बापू करंजकर बार्शी,शारदा परशुराम करंजकर,वडील माणिकराव जमाले, आई रंजना जमाले,प्राचार्य सच्चिदानंद लोमटे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.प्रकाशन प्रसंगी मनोगत व्यक्त करताना बाळासाहेब जमाले यांनी मराठी उतारे या पुस्तकाची आवश्यकता विषद केली. नवोदय निवड परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना गणित विषय सोपा वाटतो परंतु मराठी विषयाकडे दुर्लक्ष केल्यामुळे उताऱ्यावरील प्रश्न चुकतात व मराठीला कमी गुण मिळतात.त्यामुळेच आपण या पुस्तकाची निर्मिती केल्याचे त्यांनी सांगितले.पुस्तक प्रकाशन प्रसंगी जगन्नाथ धायगुडे यांनी कसबे तडवळे गावातील नवोदय शिष्यवृत्तीचा पॅटर्न याची सविस्तर माहिती दिली. गरीब विद्यार्थ्यांना सी.बी.एस.ई. मधून शिक्षण घेण्यासाठी नवोदयमध्ये निवड होणे कसे गरजेचे आहे ते सांगितले.ज्येष्ठ विधिज्ञ परशुराम करंजकर यांनी पुस्तक काढल्याबद्दल जमाले सरांचे अभिनंदन केले. त्याच बरोबर स्पर्धा परीक्षेचे मोफत मार्गदर्शन करतात याबद्दल सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.रामचंद्र महाराज तडवळकर यांनी अध्यक्षीय समारोपात आज रामनवमीच्या दिवशी या पुस्तकाचे प्रकाशन होत आहे हा कपिलाष्ठमीचा  मोठा योग आहे असे सांगितले.जमाले कुटुंबीयांचे शिक्षण क्षेत्रातील योगदान तसेच धार्मिक कार्य चांगले असल्याचे सांगितले.मराठी उतारे  या पुस्तकाच्या हजारो प्रति विकल्या जातील असा आशीर्वाद ही दिला. याप्रसंगी स्वतःच्या घरी दररोज मुलांना शिकवणाऱ्या  शर्मिला जमाले यांचाही सत्कार रामचंद्र महाराज यांच्या हस्ते करण्यात आला.आभार प्रदर्शन करताना शिवाजी महाविद्यालय येथील डॉक्टर डी.के.जमाले यांनी पुस्तकाच्या निर्मितीमध्ये त्यांचे बंधू बाळासाहेब जमाले यांच्या अर्धांगिनी सौ नंदिनी जमाले यांचाही सिंहाचा वाटा असल्याचे सांगितले.तसेच त्यांचे हे चौथे पुस्तक प्रकाशित झाले असून ते स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे सांगितले व सर्व उपस्थितांचे जमाले परिवाराच्या वतीने आभार मानले. 
       पुस्तक प्रकाशन प्रसंगी कन्या शाळेचे मुख्याध्यापक रहिमान सय्यद, जगन्नाथ धायगुडे,डाॅ.दत्तात्रय जमाले,मोहम्मद नदाफ,दीपक होगले,बाळासाहेब चंद्रसेन करंजकर,मंगेश पाटील,दिलीप पानढवळे,आनंद करंजकर,हनुमंत माळी,नाना जमाले ,प्राध्यापक विशाल जमाले,गणेश करंजकर,गणेश जगदाळे,संतोष जाधव व जमाले कुटुंबीय व मित्रपरिवार उपस्थित होते.
Reactions

Post a Comment

0 Comments