राज्यस्तरीय पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेत गणपती फार्मसी कॉलेजचे यश
टेंभूर्णी (कटूसत्य वृत्त):-
सरस्वती इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी तोंडवली, कणकवली येथे फार्मास्युटिकल सायन्सेसवरील राज्यस्तरीय पोस्टर स्पर्धा आयोजित केली होती, ज्यामध्ये महाराष्ट्रातील विविध फार्मसी कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना फार्मास्युटिकल सायन्सेस क्षेत्रातील त्यांचे संशोधन, नाविन्यपूर्ण कल्पना आणि तांत्रिक ज्ञान प्रदर्शित करण्यासाठी एक उत्कृष्ट व्यासपीठ उपलब्ध झाले.
यात टेंभुर्णी येथील श्री गणपती इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल सायन्सेस अँड रिसर्चच्या विद्यार्थ्यांनी उस्फुर्त असा सहभाग नोंदवला. दुसऱ्या वर्षाचे विद्यार्थी अनिकेत गायकवाड आणि जीवन गावडे यांनी पोस्टर प्रेझेंटेशन प्रकारात तिसरे पारितोषिक जिंकले. औषधी वनस्पतींच्या वापरावरील त्यांच्या संशोधनात दाखवलेल्या विश्लेषणाची खोली आणि सर्जनशील दृष्टिकोन पाहून परीक्षक प्रभावित झाले.
ही स्पर्धा औषधनिर्माणशास्त्राच्या क्षेत्रात संशोधनाची महत्त्वाची भूमिका आणि विद्यार्थ्यांमध्ये नवोपक्रमाला चालना देण्याचे महत्त्व याची आठवण करून देणारी ठरली.
महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. रुपाली बेंदगुडे, सचिव डॉ. आर. डी. बेंदगुडे अध्यक्ष अॅड. विजयराव हिरवे, उपाध्यक्ष बाबा येडगे यांनी सर्व विजेत्यांचे अभिनंदन केले.
सदर स्पर्धेसाठी प्रा. सोनाली तांबवे आणि प्रा. शैलेश पेंदोर यांनी मार्गदर्शन केले.
0 Comments