शिवसेना माळशिरस तालुक्याची अकलूज येथे आढावा बैठक, एक कॉल समस्या स्वाल बैठकीत निर्णय - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, April 8, 2025

शिवसेना माळशिरस तालुक्याची अकलूज येथे आढावा बैठक, एक कॉल समस्या स्वाल बैठकीत निर्णय

 शिवसेना माळशिरस तालुक्याची अकलूज येथे आढावा बैठक, एक कॉल समस्या स्वाल बैठकीत निर्णय




नातेपुते (कटूसत्य वृत्त):- शिवसेना शिंदे गट माळशिरस तालुक्याची आढावा बैठक अकलूज येथील शासकीय विश्रामगृहात
 जिल्हा संपर्क नेते महेश साठे ,जिल्हा प्रमुख महेश चिवटे युवासेनचे जिल्हाप्रमुख प्रियदर्शन साठे, उपजिल्हाप्रमुख दिपक खंडागळे, तालुकाप्रमुख सतीश सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. बैठकी दरम्यान तालुकाप्रमुख सतीश सपकाळ बोलत असताना म्हणाले की, येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व निवडणुका शिंदे गट शिवसेनेच्या वतीने ताकदीनिशी लढविण्यासाठी व पक्ष वाढ विस्तार तसेच तालुक्यातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी विविध समिती स्थापन करून निराकरण करण्यात येईल तसेच एक कॉल समस्या स्वाल हा देखील उपक्रम राबवण्यात येणार असल्याचे आडवा बैठकी प्रसंगी शिवसेनेचे तालुकाप्रमुख सतीश सपकाळ यांनी व्यक्त केले.
    यावेळी महेश साठे ,महेश चिवटे,प्रियदर्शन साठे,ओबीसी महासंघाचे अध्यक्ष भीमराव भुसणर, तालुका कार्यप्रमुख महादेव तुपसौंदर,तालुका उपप्रमुख सुनील साठे, सहसमन्वयक अशोक शिंदे, अकलूज शहराध्यक्ष महेश पवार, शिवसैनिक शिवाजी नाईकनवरे , सामाजीक कार्यकर्ते सुधीर साठे ,शिवसैनिक सुधीर पवार , समीर शेख आदींनी आपले मनोगत व्यक्त केले या बैठकी प्रसंगी उपस्थित माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब सपताळे, सहसमन्वयक रावसाहेब कोकाटे, तालुका उपप्रमुख तानाजी भोळे ,तालुका उपप्रमुख रणजीत गायकवाड ,तालुका सहसंघटक पुण्यवंत मुंडफणे, तालुका सोशल मीडिया प्रमुख अमोल साठे,नातेपुते शहराध्यक्ष पै. निखिल पलंगे, उपशहर प्रमुख भैया लांडगे ,माळशिरस शाखाप्रमुख महादेव जगताप, वेळापूर शहर प्रमुख महेंद्र साठे सह तालुक्यातील सर्व शिवसैनिक युवासेना मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages