जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडून लिंगराज कुटुंबीयांचे सात्वंन
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- जिल्हा परिषद कर्मचारी युनियन चे राज्य सरचिटणीस कै. विवेक लिंगराज यांच्या निधनानंतर जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचे विवेक लिंगराज यांच्या निधनामुळे दुःखी असलेल्या लिंगराज कुटुंबीयांचे सात्वन छत्रपती संभाजी नगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन केले. या प्रसंगी जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेचे चेअरमन डाॅ. शत्रुघ्नसिंह माने, संचालक श्रीशैल देशमुख,त्रिमुर्ती राऊत व लिंगराज कुटुंबीय उपस्थित होते.
जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी मुलाला बारावी परिक्षेनंतर दिशा ठरविता येईल. नेमके काय करायचे याबाबत मार्गदर्शन केले. विवेक लिंगराज व माझे व्यक्तिगत खुप चांगले संबंध होते. मुलांनी पुढील शिक्षण चांगल्या पद्धतीने करावे. विवेक लिंगराज चे जे स्वप्न होते ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि सत्यात उतरवण्यासाठी प्रयत्न करावेत अशा शुभेच्छा दिल्या. कुठलीही मदत लागली तर हाक द्या असेही त्यांनी कुटूंबियांशी चर्चा करताना सांगितले. पेन्शन, एसबीआय विमा बाबत चर्चा केली.
0 Comments