जुनी पोलीस लाईन गृहनिर्माण संस्थेची निवडणूक बिनविरोध
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- मुरारजी पेठ भागातील जुनी पोलीस लाईन भाडेकरू सहकारी गृहनिर्माण संस्थेची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडली.
संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी एकूण 14 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. परंतु या सर्व जागा बिनविरोध करून सभासदांनी एक आदर्श घालून दिला आहे. यामध्ये अरुण देशमुख वसंत येळे वसंत ढेरे,मधुकर व्यवहारे, संजय घाडगे,अनिकेत व्यवहारे, दत्ता भोसले,प्रकाश सुरवसे, प्रभाकर व्यवहारे, नामदेव पवार, विकास घाडगे, दत्तात्रय सुरवसे, यांची पुरुष सर्वसाधारण गटातून बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच नागरबाई ढोबळे व लक्ष्मीबाई पावडे यांची महिला राखीव गटातून निवड केली गेली. या सर्व नूतन संचालकांचा निवड जाहीर झाल्यानंतर सत्कारही करण्यात आला निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून डी पी सुरवसे यांनी काम पाहिले. आता लवकरच यातून चेअरमन आणि सेक्रेटरी पदाची निवड केली जाणार आहे. ही पदे कोणाला मिळतात याकडे आता सभासदांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान यापूर्वी संस्थेवर सलग दोन वर्ष प्रशासन होते. प्राधिकृत अधिकारी शरद नागणे व सहाय्यक नागनाथ देवसानी यांच्याकडे संस्थेचा कारभार होता.
त्यामुळे ही निवडणूक झाल्याने आता नव्या संचालकावर संस्थेचा कारभार पाहण्याची जबाबदारी आली असून त्यांनी चांगल्या पद्धतीने कामकाज करावे अशी अपेक्षा सभासदांकडून व्यक्त केली जात आहे.
0 Comments