विठ्ठलवाडी येथील संस्कृती खैरे हिचे एन.एम.एम.एस परिक्षेत घवघवित यश
माढा (कटूसत्य वृत्त):- विठ्ठलवाडी येथील संभाजीराव चव्हाण विद्यालयात शिकत असलेली कु.संस्कृती मुकुंद खैरे हिने एन एम एम एस (राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती) 2024-25 परीक्षेत उज्वल यश संपादन केले आहे. एन एम एम एस परीक्षेत शिष्यवृत्तीचा अंतरिम निकाल जाहीर झाला असून त्यामध्ये संभाजीराव चव्हाण विद्यालयाने उज्वल यश संपादन केले आहे.तिने180 पैकी 117 गुण मिळवून एन.एम.एम.एन च्या शिष्यवृतीसाठी पाञ ठरली आहे.तिला 48000 रु.शिष्यवृती मिळणार आहे.यासाठी शाळेचे मुख्याध्यापक अमोल चव्हाण शिवाजी कदम ज्ञानेश्वर मस्के ,जहांगीर तांबोळी यांचे मार्गदर्शन लाभले. शिवाय विठ्ठलवाडीचे उपसरपंच हनुमंत जाधव समाजकल्याण अधिकारी संतोष जाधव प्रगतशील बागायतदार बालाजी गव्हाणे डिवायएसपी नितिन कदम पोलिस निरिक्षक बिभीषण गव्हाणे मराठा समाज सेवक दिपक आबा गव्हाणे उत्पादन शुल्कचे सुरेश शेगर सरपंच प्रतिनिधी बंडू खरात अप्पासाहेब गायकवाड ,सुनिल गोसावी आरोग्य सेवक किशोर गुंड विष्णू खैरे ब्रम्हदेव खैरे शुभम खैरे गुरुराज अबॕकसच्या संचालिका जयश्री जाधव रणजित जाधव यांनी अभिनंदन केले.
0 Comments