Hot Posts

6/recent/ticker-posts

अकलूज स्त्रीरोग तज्ञ संघटनेची कार्यकारणी जाहीर

 अकलूज स्त्रीरोग तज्ञ संघटनेची कार्यकारणी जाहीर




"वर्षभर विविध उपक्रम राबवणार - डॉ. रेवती राणे

अकलूज (कटूसत्य वृत्त):- अकलूज स्त्रीरोग तज्ज्ञ संघटनेची कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली असून,दिनांक 1 एप्रिल 2025 पासून नवीन समितीने  याची धुरा स्विकारली असल्याची माहिती नूतन अध्यक्ष डॉ.रेवती राणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
यापूर्वी  स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. रेवती राणे यांनी इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्रराज्य महिला शाखा  अध्यक्षा म्हणून काम पाहिले आहे.तसेच त्यांची महाराष्ट्र राज्य स्त्रीरोगतज्ञ जनजागृती समितीच्या अध्यक्षा म्हणून नियुक्ती झाली असून, उपाध्यक्ष डॉ विनोद कुमार शेटे (अकलूज), सचिव डॉ कविता कांबळे (करमाळा), सहसचिव डॉ अमित चोपडे (टेंभुर्णी), कोषाध्यक्ष डॉ विशाल शेटे (करमाळा) यांनी पद धारण केले आहे. तर कार्यकारी सदस्यांमध्ये डॉ सचिन गवळी ( अकलूज), डॉ मदन कांबळे (टेंभुर्णी), डॉ दिग्विजय राऊत (अकलूज), डॉ अमोल फडे (अकलूज), डॉ उत्कर्ष गांधी (नातेपुते), डॉ जागृती मगर (अकलूज) डॉ. गायत्री एकतपुरे (माळीनगर) यांचा समावेश आहे.
अकलूज स्त्रीरोग तज्ज्ञ संघटना 12 वर्षांपासून सक्रियपणे कार्यरत असून माळशिरस, म्हाडा, इंदापूर, करमाळा या तालुक्यामधील 40 स्त्रीरोग तज्ज्ञ त्याचे सदस्य आहेत. या संघटनेची स्थापना 5 डिसेंबर 2013 रोजी करण्यात आली. डॉ. वंदना गांधी या त्याच्या संस्थापक आहेत. सीनियर स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ सतीश दोषी, डॉ सविता गुजर, डॉ भारत पवार, डॉ विनोद शेटे, डॉ मदन कांबळे, डॉ प्रिया कदम यांनीही या पूर्वी याचे अध्यक्ष पद भूषवले आहे.
औपचारिक पदग्रहण सोहळा, 27 एप्रिल रोजी, महाराष्ट्र राज्य स्त्रीरोगतज्ञ संघटनेचे अध्यक्ष डॉ किरण कुर्तकोटी यांच्या उपस्थितीत आयोजित केला असल्याचे डॉ.रेवती राणे म्हणाल्या.तसेच यामधे पुरुष वंध्यत्वावर परिषद व कार्यशाळेचे पण आयोजन केले असल्याचे त्या म्हणाल्या.आगामी कार्यक्रमांमध्ये, स्त्रीरोग तज्ज्ञांसाठी अत्याधुनिक व मार्गदर्शनपर परिषदांचे नित्यनियमाने आयोजन करण्यात येईलच पण त्याच बरोबर, जनजागृती कार्यक्रमांवर भर दिला जाणार आहे त्यामधे सुरक्षित मातृत्व अभियानांतर्गत उपजिल्हा रुग्णालय अकलूज येथे गर्भवती मातांसाठी 15 एप्रिल रोजी खास कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. याच बरोबर स्तनांच्या कर्करोगांसाठी मिशन पिंक पामस, पिशवीच्या कर्क रोगासाठी सुरक्षा कवच कॅम्पेन, आरोग्य दिंडी, स्तनपानाचे महत्व सांगणारे रिश्ता रेशीमगाठी ईत्यादी उपक्रम राबवण्यात येणार आहेत. या कार्यक्रमाअंतर्गत, सर्व स्त्रीवर्ग, नर्सिंग स्टाफ, आशा सेविका अशा सर्वांना मार्गदर्शन केले जाईल असेही म्हणाल्या.
"महिला स्वास्थ्यम् सर्वसुखानाम्" हे धोरण असलेली ही नवनियुक्त समिती स्त्रीहित व स्त्री आरोग्यासाठी कायम प्रयत्नशील राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Reactions

Post a Comment

0 Comments