राज्याला अवकळी पावसाने झोडपलं; उभी पिकं झाली आडवी, शेतकऱ्यांचे नुकसान
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- राज्याला अवकाळी पावसाने झोडपणे सुरुच आहे. अचानक बरसलेल्या पावसामुळे शेती पिकांचे मोठं नुकसान झालं आहे. सोलापूर, कोकण भागात कोसळलेल्या पावसामुळे पेरू, आंबा फळांचं नुकसान झालं आहे.
पावसानंतर काही ठिकाणी वीजपुरवठाही खंडित झाला आहे.
सांगोल्याला पावसाचा फटका
सोलापुरातील सांगोला तालुक्यातील अनेक गावांना वादळी वारे आणि अवकाळी पावसाचा फटका बसलाय. यात पेरु, आंबा या फळांच मोठं नुकसान झालंय. तसचं दिनकर पवार या शेतकऱ्याचं पॉली हाऊस जमिनदोस्त झालंय.
सावंतवाडीत चक्रीवादळासह मुसळधार पाऊस
सावंतवाडी तालुक्यातील बांदा शहर आणि परिसराला चक्रीवादळासह मुसळधार पावसाने झोडपून काढलंय..तब्बल दोन तास झालेल्या मुसळधार पावसामुळे झाडे उन्मळून पडली. काही वेळासाठी वीजपुरवठा खंडित झाला होता. मुसळधार पावसाचा केळी आणि काजू पिकाला फटका बसलाय.
वातावरणाचा पिकांना फटका
मुरूड परिसरात ढगाळ वातावरणाचा फटका आंबा पिकावर बसलाय. आंब्यावर फळाची वाढ पूर्ण होण्यापुर्वीच करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला
महाडमध्ये अवकाळी पाऊस
रायगडच्या महाडमध्ये अवकाळी पाऊस झाला. तसेच बस स्थानकात पाणीच पाणी पाहायला मिळालंय. महाड ST स्थानकात रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच काम सुरूय. यामुळे उंच सखल भाग निर्माण झाले असून पावसानंतर बस स्थानकातील कंट्रोल केबीन समोर पाणी साचले
बोटींना बदंरात येणे बंधनकारक
बदलत्या हवामान आणि एकवीरा देवीच्या उत्सवामुळे मोठ्या प्रमाणात मासेमारी बोटी किनाऱ्यावर लागल्यात.. हवामान खात्याकडून देण्यात आलेला यलो अलर्ट पाहता बोटींना बंदरात येणे बंधनकारक आहे.
खराब हवामानामुळे मासेमारी कठीण
खराब हवामानामुळे सुरक्षेसाठी मच्छिमार बांधवांनी आपल्या नौका किनारी नांगरुन ठेवल्यायत. पुढील 2 दिवस वादळी वाऱ्याचा इशारा असल्यानं काळजी घेतली जातेय. आठवडाभर वादळी वाऱ्यामुळे समुद्र खवळलाय. त्यामुळे मासे मिळणंही कठीण झालंय.
0 Comments