Hot Posts

6/recent/ticker-posts

अकलूजच्या स्माईल एफ एम रेडिओने मनोरंजना बरोबरच समाज प्रबोधनाचे कार्य केले आहे - इशिता धैर्यशील मोहिते-पाटील

 अकलूजच्या स्माईल एफ एम रेडिओने मनोरंजना बरोबरच समाज प्रबोधनाचे कार्य केले आहे - इशिता धैर्यशील मोहिते-पाटील




अकलूज (कटूसत्य वृत्त):- प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबापर्यंत पोहचण्याचे प्रभावी माध्यम स्माईल एफ.एम.ने केले असून मनोरंजनाबरोबरच समाज प्रबोधनाचे कार्य ही केले आहे.त्यामुळे स्माईल एफ एम ची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आहे.असे गौरवउद् गार कु.इशिता धैर्यशील मोहिते पाटील यांनी स्माईल एफ एम च्या तिसऱ्या वर्धापनदिनी काढले होते.
         90.8 स्माईल एफ एम च्या तिसऱ्या वर्धापन दिन आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला त्याप्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून बोलताना त्या पुढे म्हणाल्या की,ज्येष्ठ आणि तरुणांना जोडणारा रेडिओ हा  महत्त्वाचा दुवा आहे अगदी सकाळपासून रात्रीपर्यंत स्माईल एफ एम वर मनोरंजन,बातम्या, प्रबोधनात्मक व्याख्याने, मुलाखती असे विविध कार्यक्रम सादर केले आहेत.त्या त्या दिवसाच्या दिनविशेष बाबत विशेष माहिती दिली जाते आणि त्याला अनुरूप उपक्रम घेतले जातात.समाजातील तज्ञ व्यक्तींच्या मुलाखती,मुक्त चिंतनातून दैनंदिन जीवन जगत असताना कशाप्रकारे जगावे. याबाबतचे मार्गदर्शन गेल्या तीन वर्षांमध्ये स्माईल एफ एम ने केले.बघता बघता स्माईल एफ एम हे पंचवीस हजार लोकांच्या पर्यंत पोहोचले आहे ही अत्यंत अभिमानाची बाब आहे.कारण आजच्या काळात रेडिओ हे अधिकाधिक लोकांपर्यंत आपले विचार मांडण्याचे प्रभावी साधन आहे. 
         याप्रसंगी व्यासपीठावर सामाजिक कार्यकर्त्या सविता व्होरा,श्रुती गायकवाड,ॲड. हसीना शेख यांच्याबरोबर समृद्धी बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्ष रूपाली बागडे या उपस्थित होत्या.
        या कार्यक्रमाची सुरुवात रामनवमीच्या निमित्ताने प्रभू रामचंद्र यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्माईल एफ एम चे संस्थापक प्रमुख शंकर बागडे पाटील यांनी केले.सूत्रसंचालन आर.जे.वैष्णवी यांनी केले तर आभार आर.जे. सई बागडे यांनी मानले.या कार्यक्रमास अकलूज परिसरातील अनेक स्माईल एफ एम चे श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Reactions

Post a Comment

0 Comments