कॅन्सर तपासणीमध्ये सोलापूर जिल्हा अग्रस्थानी- डॉ. सुहास माने
अकलूज (कटूसत्य वृत्त):- शासनाच्या असंसर्गिक रोग कार्यक्रमांतर्गत कॅन्सर डायक्नोस्टिक व्हॅन मार्फत कॅन्सर तपासणीमध्ये संपूर्ण राज्यात सोलापूर जिल्हा अग्रस्थानी असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुहास माने यांनी सांगितले.
माळशिरस ग्रामिण रुग्णालयात कर्करोग तपासणी शिबिराचे ऊद्घाटन माळशिरस चे माजी नगराध्यक्ष अप्पा साहेब देशमुख यांचे शुभहस्ते व जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. सुहास माने,डॉ. रोहन वायचळ यांचे प्रमुख उपस्थित संपन्न झाले.
यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. मुकुंद जामदार,डॉ. मेघराज कोतमिरे,डॉ. प्राजक्ता मुळे,डॉ. मयुरा काळे,डॉ. सावन पालवे,डॉ. दत्तात्रय सर्जे,डॉ. सागर कोळेकर, डॉ. भारत पवार यांचेसह सर्व अधिकारी उपस्थित होते.
पुढे बोलताना जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुहास माने यांनी संपूर्ण जिल्ह्यातील कॅन्सर तपासणी व रुग्णांची माहिती दिली.जिल्ह्यातील मौखिक कर्करोग, गर्भाशय कर्करोग, स्तनाचा कर्करोग रुग्णांची माहिती दिली.
यामध्ये मोरोची (ता. माळशिरस) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आयोजित करण्यात आलेल्या शिबिरामध्ये मुख कर्करोग 28,स्तनाचा कर्करोग 57,गर्भाशय कर्करोग 57 असे एकुण 142 ,नातेपुते-अनुक्रमे 82,92,74 एकुण-248 माळशिरस- मुख कर्करोग-93,स्तनाचा कर्करोग-81,गर्भाशय मुख कर्करोग- 53 एकुण-227
अशाप्रकारे रूग्णाची तपासणी करण्यात आली.तपासणी मध्ये नातेपुते येथील एका रुग्णाचा नमुना पुढे तपासणी साठी पुढे पाठविण्यात आला आहे.सदरची तपासणी पुढील एक महिना चालु राहणार आहे.संपूर्ण जिल्ह्यातील नागरीकांनी सदर तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा असे अवाहन डॉ. सुहास माने यांनी नागरिकांना केले आहे.
0 Comments