Hot Posts

6/recent/ticker-posts

होटगी संस्थेत तपोरत्नं जयंती साजरी

 होटगी संस्थेत तपोरत्नं जयंती साजरी



सोलापूर, (कटुसत्य वृत्त):- श्री बृहन्मठ होटगी संचलित एमआयडीसी येथील चन्नवीर नगरातील श्री गुरु होटगीश्वर आश्रममध्ये तपोरत्नं जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

काशी जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांच्या अध्यक्षतेखाली तपोरत्नं योगिराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजींची ९५ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी डॉ. राजेंद्र घुली यांच्या हस्ते मठातील जगन्नाथ शास्त्री व जंगम बटूच्या वैदिकत्वाखाली महास्वामीजींच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांच्या हस्ते महास्वामीजींच्या मूर्तीस पुष्पमाला अर्पण करण्यात आले. त्यानंतर डॉ. राजीव मठ यांच्याकडून श्रीमद् जगद्गुरुंना मालार्पण करण्यात आले.

तपोरत्नं योगिराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांच्या जयंती उत्सवानिमित्त श्रीक्षेत्र होटगी गावांमधील तपोरत्नं मंदिरात गुरु गादीस व बाळीवेस मठातील महास्वामीजींच्या मूर्तीस रुद्राभिषेक करण्यात आले. याशिवाय बृहन्मठ होटगी शैक्षणिक संस्थेतील सर्वच शिक्षण शाखांमध्ये योगिराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांची ९५ वी जयंती उत्सव मोठ्या भक्तिभावाने संपन्न झाले. एमआयडीसी येथील आश्रमामधील कार्यक्रमास संस्थेचे सचिव शांतय्या स्वामी, मल्लू पाटील, स्वामीनाथ कलशेट्टी, हणमंतू पाटील, यमनप्पा होटगोंड, संतोष हिरेमठ, बसू स्वामी, श्रीशैल मठपती व सोलापूर, होटगी, बोरामणी, धोत्री, दर्गनहळ्ळी आदी गावांतील सद्भक्त मंडळी उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments