नातेपुते विकास आराखड्याला न्यायालयीन स्थगिती नगरसेवकांचे यश, नगरसेवक नागरिकांच्या बरोबर
नातेपुते (कटूसत्य वृत्त):- नातेपुते शहर प्रारूप विकास आराखडा हा चुकीच्या पद्धतीने झाला विकास आराखड्याच्या विरोधात नातेपुते नगरपंचायत चे नगरसेवक हे विकास आराखड्याच्या विरोधात होते. सर्व नगरसेवक सुरुवातीपासून नातेपुते शहरातील नागरिकाबरोबर आहेत. आमचे मार्गदर्शक बाबाराजे देशमुख, मामासाहेब पांढरे, अतुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बारा नगरसेवक यांनी मुंबई उच्च न्यायालयात आराखडा विरोधात याचिका दाखल करून विकास आराखड्यामध्ये गंभीर चुका असल्याचे निदर्शनास आणल्याने न्यायालयाचे न्यायमूर्ती अजय गडकरी व न्यायमूर्ती कमल खाता यांनी नातेपुते शहर प्रारूप विकास आराखड्याला स्थगिती दिल्याने नातेपुते नगरसेवकांना प्रारूप विकास आराखडा रोखण्याबाबत यश मिळाले असल्याचे मत नातेपुते नगरपंचायतीचे माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक मालोजीराजे देशमुख यांनी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केले.
यावेळी अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती मामासाहेब पांढरे, उपनगराध्यक्ष अतुल पाटील, माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक मालोजीराजे देशमुख, रणजीत पांढरे बाळासाहेब काळे अविनाश दोशी रणवीर देशमुख नंदकुमार केंगार अतुल बावकर शक्ती पलंगे सुरेंद्र सोरटे व पत्रकार उपस्थित होते. यावेळी पुढे बोलत असताना मालोजीराजे देशमुख म्हणाले की, नातेपुते नगरपंचायतीचा प्रारूप विकास आराखडा हा शासनाने बाहेरचे एजन्सी नेमून केला होता. त्यांना ग्रामीण भागात आरक्षण टाकण्याचा अनुभव नसल्याने शासनाच्या जागा वगळता अनेकांच्या गट नंबरवर तसेच ज्या ठिकाणी रेसिडेन्शिअल एरिया आहे त्या ठिकाणी इंडस्ट्रियल एरिया दाखवण्यात आला. प्लेग्राउंड तसेच रस्त्यांच्या बाबतीत देखील अनेक चुका या एजन्सीने केल्या आहेत. अनेक लोकांच्या जागेवर आरक्षण टाकले गेले होते यासाठी दिनांक ३ मार्च २०२५ रोजी चुकीच्या झालेल्या विकास आराखडया विरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात १२ नगरसेवक यामध्ये अतुल पांढरे - पाटील, संगीता काळे, सुरेश सोरटे, भारती पांढरे, मालोजीराजे देशमुख, अण्णा पांढरे, रणजीत पांढरे, स्वाती बावकर, उत्कर्षाराणी पलंगे, अनिता लांडगे, दीपिका देशमुख, अविनाश दोशी यांनी याचिका दाखल केली होती त्याची सुनावणी २८ एप्रिल २०२५ रोजी झाली असून त्याला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे त्यासाठी अॅड. भूषण वाळिंबे, अॅड.रणवीर देशमुख यांनी काम पाहिले असल्याचे मत मालोजीराजे देशमुख यांनी व्यक्त केले. तसेच शासनाने ज्या जागेवर आरक्षण टाकले गेले आहे त्या लोकांवर कोणताही अन्याय होणार नाही आम्ही सर्व नगरसेवक नातेपुते शहरातील नागरिकांबरोबर आहोत त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही संभ्रमात राहू नये असे आवाहन घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये सर्व नगरसेवक यांनी केले आहे.
0 Comments