शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांनी शतक पूर्ण करत घडवला इतिहास
कसबे तडवळे (कटूसत्य वृत्त):- जिल्ह्यासह राज्यात शिक्षणाची पंढरी अशी ओळख मिळवलेल्या जिल्हा परिषद आदर्श कन्या शाळा,केंद्रीय प्राथमिक मुलांची शाळा व जय हिंद विद्यालयातील विद्यार्थ्यांनी फेब्रुवारी 2025 मध्ये घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत प्रथमच इतिहास घडवत तब्बल 112 विद्यार्थी पात्र ठरले आहेत. गेल्या अनेक वर्षापासून सतत 365 दिवस चालणारी गावातील आदर्श कन्या शाळा असल्याने. या शाळेचे शिक्षणमंत्र्यांसह मुख्यमंत्र्यांनी सीईओ यांच्यासमोर कौतुक केले होते. या शाळेत मागील आठवड्यात जिल्हा परिषदेचे सीईओ मैनक घोष यांनी देखील भेट दिली होती. शिष्यवृत्ती परीक्षेत जय हिंद विद्यालयातील 16 विद्यार्थी, जिल्हा परिषद आदर्श कन्या शाळेतील 55 विद्यार्थी तर केंद्रीय प्राथमिक मुलांच्या शाळेतील 41 विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. या सर्व विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक रहेमान सय्यद, जगन्नाथ धायगुडे, शहाजी पुरी, संजय देशटवाड, गणपती यावलकर, राणी अंधारे,अनिता देशमुख आदर्श केंद्रीय प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक केशव पवार, बाळासाहेब जमाले, अंबिका कोळी, दत्तात्रय मगर, मोहम्मद नदाफ, ढवळे सर तर जय हिंद विद्यालयातील जे,बी, बोराडे, एस, टी,पालके, आर,जी, कोकणी, श्रीमती ए,जी, कोरडे, पी, सी, क्षीरसागर व स्पर्धा परीक्षा प्रमुख पी,के, ठाकरे यांचे मार्गदर्शन लाभले. या सर्व शिक्षकांचा शिक्षण प्रेमी तरुणांनी सत्कार केला.या वेळी मनसे विद्यार्थी सेनेचे तालुका अध्यक्ष केतन कदम,मनसे शाखा अध्यक्ष धनंजय गायकवाड समाधान पवार, सौरभ जमाले, हरी पवार,ऋषिकेश गुळवे,राहुल निकम, आकाश माळी हे उपस्थित होते.
0 Comments