१९८५ च्या बॅचचे दहावीचे मित्र- ४० वर्षानी एकवटले-आठवणींना उजाळा
माढा (कटूसत्य वृत्त):- माढ्यातील स.म.गणपतराव साठे जिल्हा परिषद प्रशालेतील दहावी इयत्तेमधील १९८५ सालचे विद्यार्थ्याचा स्नेहमेळावा उत्साही वातावरणात पार पडला.
माढ्यातील सावली गार्डन मध्ये मेळाव्याचे आयोजन केले होते.ग्रामदैवत श्री माढेश्वरी देवीच्या प्रतिमापुजनाने मेळाव्यास प्रारंभ झाला. ज्या शिक्षकांमुळे गुणवत्ता पुर्ण शिक्षण मिळाले अश्या डि.व्ही.चवरे,व्ही.एम.गायकवाड, पाटील आदी गुरुजनांचा सन्मान माजी विद्यार्थ्याच्या हस्ते पार पडला.शाळेत जाऊन माजी विद्यार्थ्यानी शाळेतील आठवणींना उजाळा देखील मिळवला.४० वर्षांनी भेटल्यानंतर विद्यार्थ्यानी आपण कसं घडलो आणी यात शाळेचे आणी शिक्षकांचे योगदान किती हे सांगताना गहिवरुन आल्याचे पहायला मिळाले.
तर काहींनी शाळेतील जुने प्रसंग सांगताना मनसोक्तपणे गाण्याच्या भेड्यासह विविध मनोजरंजनाचे खेळ पार पडले यामुळे सर्व विद्यार्थी उल्हासित झाले.स्नेह मे॓ळाव्यास आलेल्या विद्यार्थ्याना श्री. माढेश्वरी देवीची प्रतिमा असलेले सन्मानचिन्ह स्मरणार्थ देण्यात आले.
यावेळी नायब तहसीलदार विजय कवडे,पोलीस निरीक्षक राऊत आदी सह मुंबई,पुणे,धाराशिव विविध भागातील माजी विद्यार्थी उपस्थित होते
कार्यक्रमाचे नियोजन आत्माराम चवरे,आदिनाथ शहाणे, दत्ताजी शिंदे,धनूभाऊ शहाणे, सुधीर वारगड यांनी केले.
सूत्र संचालन आदिनाथ शहाणे यांनी तर आभार प्रदर्शन आत्माराम चवरे यांनी मानले.
0 Comments