Hot Posts

6/recent/ticker-posts

ग्रामपंचायत निवडणुकीत आजीमाजी आमदारांचा लागणार कस

ग्रामपंचायत निवडणुकीत आजीमाजी आमदारांचा लागणार कस

 पंढरपूर  (कटूसत्य वृत्त):- पंढरपूर तालुका हा चार विधानसभा मतदारसंघात विभागला गेला आहे. त्यामुळे आपापल्या मतदारसंघातील गावांवर प्राबल्य मिळविण्यासाठी चारही आमदारांनी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत. या निवडणुकीत दुभंगलेल्या विठ्ठल परिवाराचा कस लागणार आहे. याशिवाय कारखान्याचे अध्यक्ष व माजी आमदारांनीही तालुक्याच्या  राजकारणावर पकड ठेवण्यासाठी फिल्डिंग ल्याचे चित्र आहे पंढरपूर तालुक्यातील ४२ गावे ही माढा मतदारसंघाला जोडण्यात आली आहेत. पंढरपूर शहरासह २२ २२ गावे मंगळवेढा, १७ गावे मोहोळ तर १४ गावांचा समावेश सांगोला मतदारसंघात करण्यात आला आहे. आरक्षण सोडतीमध्ये माढ्याचे आमदार अभिजित पाटील यांच्या देगावमध्ये, कै. आमदार भारत भालके यांच्या सरकोलीमध्ये सर्वसाधारण आरक्षण आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबातील सदस्य उमेदवार राहणार का, याकडे लक्ष लागले आहे.

माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या खर्डी व राष्ट्रवादीचे नेते गणेश पाटील यांचे भोसे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे यांच्या भाळवणीमध्ये एससी आरक्षण आहे. कल्याणराव काळे यांच्या वाडीकुरोलीत नामप्र महिला आरक्षण आहे. माजी जिल्हा परिषदेचे सदस्य सुभाष माने यांच्या ईश्वरवठारमध्ये सर्वसाधारण महिला, पांडुरंग कारखान्याचे माजी अध्यक्ष वसंतराव देशमुख यांच्या कासेगावमध्ये सर्वसाधारण, झेडपी सदस्य बाळासाहेब देशमुख यांच्या करकंबमध्ये सर्वसाधारण महिला, प्रकाश पाटील यांच्या तुंगतमध्ये सर्वसाधारण आरक्षण असल्यामुळे सरपंच पदासाठी मोठी रस्सीखेच दिसणार आहे.

मागील अनेक वर्षांपासून पंढरपूर तालुक्यात परिचारक व विठ्ठल परिवारामध्ये प्रत्येक निवडणुकीत संघर्ष पाहायला मिळत होता. मात्र विठ्ठल कारखान्यात सत्तांतर झाल्यानंतर विठ्ठल परिवार ही काळे, भालके, पाटील व आ. अभिजित पाटील गटात विभागला आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत हे दोन्ही गट सोबत येणार की एक गट परिचारकांशी सलगी करत अभिजित पाटील यांना आव्हान देणार, याकडे लक्ष आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments