सोलापूर बाजार समितीत
अखेर माने कल्याणशेट्टी- हसापुरे पॅनेलची बाजी;
सोलापूर (कटूसत्य वृत्त):-सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सोसायटी मतदारसंघातील तब्बल 11 जागांच्या बळावर भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी आमदार दिलीप माने, सुरेश हसापुरे यांच्या पॅनेल सत्ता मिळविण्यात पुन्हा एकदा यशस्वी ठरला आहे. ग्रामपंचायत मतदारसंघान सुभाष देशमुख यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने तीन जागा जिंकून प्रथमच बाजार समितीत खाते उघडले आहे. मात्र, सत्ता मिळविण्यात देशमुखांना पुन्हा एकदा अपयश आले आहे.माने कल्याणशेट्टी- हसापुरे पॅनेलने सहकारी संस्थांतील अकरा, ग्रामपंचायतमधील एक आणि हमाल तोलार मतदारसंघातील एक अशा तेरा जागा जिंकत विजय मिळविला आहे. विरोधी सुभाष देशमुख गटाला तीन जागांवर समाधान मानावे लागले आहे, व्यापारी मतदारसंघातून दोन अपक्ष उमेदवार निवडून आले आहेत. मागील 2017 च्या निवडणुकीतही सुभाष देशमुख हे विरोधातच होते. त्यांच्या विरोधात भाजपचे विजयकुमार देशमुख, दिलीप माने, सुरेश हसापुरे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बळीराम साठे यांचे पॅनेल होते. मागील निवडणुकीत देशमुख, दिलीप माने साठेंच्या पॅनेलने सर्वच सर्व जागा जिंकल्या होत्या. सुभाष देशमुख यांच्या पॅनेलला एकही जागा मिळालेली नव्हती. यावेळी मात्र त्यांनी ग्रामपंचायत मतदारसंघातील तीन जागा जिंकून बाजार समितीत एन्ट्री केली आहे. आमदार तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी यांनी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने, सुरेश हसापुरे, राजशेखर शिवदारे यांना सोबत घेऊन बाजार समितीची निवडणूक लढवली. भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांनी मात्र कॉंग्रेससोबतची युती मान्य नसल्याचे सांगून बाजार समितीसाठी स्वतंत्रपणे दंड थोपटले होते. सोसायटी मतदारसंघ हा दिलीप माने आणि सुरेश हसापुरे यांचा बालेकिल्ला मानला जातो, त्या बालेकिल्ल्याच्या जोरावरच ही जोडळी आतापर्यंत बाजार समितीत बाजी मारत आली आहे. या वेळी पुन्हा तेच झाले आहे.
सहकारी संस्था मतदारसंघातून कल्याणशेट्टी, माने आणि हसापुरे यांच्या पॅनेलचे सर्वच सर्व ११ उमेदवार निवडून आले आहेत. त्यांनी विरोधकांना सरासरी एवढ्या ८०० मतांच्या फरकानी मात दिली आहे. सोसायटी मतदारसंघातून विरोधी सुभाष देशमुख यांच्या पॅनेलच्या उमदेवारांना तीन आकडी संख्याही गाठता आलेली नाही, त्यामुळे बाजार समितीला दंड थोपटणाऱ्या देशमुखांना सहकारी संस्था मतदारसंघातून मात देण्याची कला माने यांनी आत्मसात केलेली आहे.
0 Comments