Hot Posts

6/recent/ticker-posts

करमाळा अर्बन बँकेचे निर्बंध उठले : प्रा. झोळ

 करमाळा अर्बन बँकेचे निर्बंध उठले : प्रा. झोळ

                                                 

करमाळा(कटुसत्यवृत्त):- करमाळा अर्बन बँकेचे निर्बंध उठले असून निवडणूक लढवणाऱ्या इच्छुक उमेदवारांना डिपॉझिट व शेअर्सच्या रकमा भरता येणार आहेत. अशी माहिती दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांनी पत्रकारांना दिली.

दि करमाळा अर्बन को ऑप बँकेची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून अर्ज भरण्याची शेवटची तारीख ११ एप्रिल २५ आहे. यापूर्वी अर्बन को-ऑ. बँकेवर रिझर्व बँकेचे निर्बंध होते. त्यामुळे अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांना पूर्ण शेअर्सच्या रकमा व डिपॉझिटच्या रकमा बँकेत भरता येत नव्हत्या. निवडणूक लढण्यासाठी सभासदाचा पाच हजार रुपये रकमेचा पूर्ण शेअर असणे गरजेचे आहे. याबरोबरच २५ हजार रुपये अनामत रक्कम बँकेत असणे गरजेचे आहे. ही अट महत्वाची असल्याने व बँकेवर निर्बंध असल्याने या रकमा कशा भरायच्या याबाबत कसलेही मार्गदर्शक तत्वे जाहीर करण्यात आले नव्हते. त्यामुळे निवडणूक लढवणाऱ्या इच्छुकांची गळचेपी झाली होती. निवडणूक विभागाचा ही सावळा गोंधळ असल्याने याबाबत ठोस उपाययोजना करण्यात आला नसल्याने प्रा. रामदास झोळ यांनी तातडीने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना संपर्क करून पत्र व्यवहार केला.

बँकेवरील आर्थिक निर्बंध उठवण्यास किंवा त्यामध्ये शिथिलता आणण्यास सांगितले. याबरोबरच प्रा रामदास झोळ यांनी मंत्रालयिन पातळीवर अर्थमंत्रीसह आयुक्तांनाही याबाबत साकडे घातले होते. याबरोबरच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना प्रश्न सोडवण्याची विनंती केली. लोकशाही मार्गाने निवडणूक होण्यासाठी पारदर्शकता असणे गरजेचे आहे असे सांगून तात्काळ मार्ग काढण्याची विनंती केली होती.

या गोष्टीची तातडीने वरिष्ठ पातळीवर दखल घेऊन हे अडचणीचे निर्बंध उठवले गेले आहेत. अर्बन बँकेच्या निवडणुकीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना आता बँकेमध्ये शेअरच्या रकमा आणि डिपॉझिटच्या रकमा भरता येणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी व प्रा. रामदास झोळ यांनी बँकेच्या सर्व अधिकाऱ्यांचे निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निबंधक, सहकार निबंधक यांचे सहकार्य लाभल्याने ऋण व्यक्त केले आहे.

बँकेला उद्या सुट्टी असून परवा बँकेत मोठी गर्दी होऊ शकते. यामुळे भागधारकाच्या व अनामत रक्कम भरण्यासाठी वेगळा कक्ष चालू करावा असे झोळ यांनी मागणी केली आहे. जास्तीत जास्त सभासदांनी उमेदवारी अर्ज दाखल करावेत असे आवाहनही प्रा. झोळ यांनी केली आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments