पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते समस्त वारकरी मंडळाच्या वास्तूचे भूमिपूजन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, April 5, 2025

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते समस्त वारकरी मंडळाच्या वास्तूचे भूमिपूजन

 पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते  समस्त वारकरी मंडळाच्या वास्तूचे भूमिपूजन 

 




        पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- समस्त वारकरी मंडळ मौजे गोंदवले बुद्रुक, (ता माण) यांच्या वैष्णव नगर,पंढरपूर येथील नियोजित वास्तूचे भूमिपूजन राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते करण्यात आले.
      यावेळी प्रांताधिकारी सचिन इथापे, तहसीलदार सचिन लंगुटे, उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले, गटविकास अधिकारी सुशील संसारे यांच्यासह गोंदवले बुद्रुक येथील वारकरी भाविक तसेच मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
      यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले, गोंदवलेकर महाराजांच्या पवित्र नगरीतले गोंदवलेकर महाराजांचे निस्सिम भक्त गोंदवलेकर महाराजांची पालखी घेऊन विठुरायाच्या नगरीत मोठ्या भक्ती भावाने येतात. पंढरपुरात येणाऱ्या गोंदवले येथील वारकरी भाविकांना समस्त वारकरी  मंडळाची नियोजित वास्तूमुळे भजन, कीर्तन, धार्मिक सोहळे याबरोबरच राहण्यासाठी चांगली व्यवस्था उपलब्ध होणार असल्याचे मत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages