अक्कलकोट मध्ये लाईट गेल्यामुळे संतप्त नागरिकांनी महावितरण कार्यालयात केले आंदोलन
अक्कलकोट (कटूसत्य वृत्त):- अक्कलकोट शहरात शनिवार रात्री ११ वाजता वीजपुरवठा खंडित झाला. मध्यरात्र उलटूनही (रविवारी ३ वाजता) लाईट येत नसल्याने संतप्त नागरिकांनी महावितरण कार्यालयात धडक दिली. ४१ अंश उकाड्यात घामाघूम झालेल्या नागरिकांनी कार्यालयात झोपून जोरदार बोंबाबोंब आंदोलन केली आणि महावितरणच्या ढिसाळ कारभारावर निषेध व्यक्त केला.
गेल्या काही दिवसांपासून अक्कलकोट शहरातील वीज वारंवार खंडित होत असून, महावितरणचे अधिकारी नागरिकांना चुकीची माहिती व फोन उचलत नसल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. नागरिकांनी स्पष्ट इशारा दिला की, "पुढे वीज पुरवठा सतत खंडित झाला तर आणखी तीव्र स्वरूपात आंदोलन छेडण्यात येईल."
महावितरणच्या दुर्लक्षामुळे नागरिकांचे हाल होत असून उन्हाच्या तीव्रतेमुळे सर्वसामान्य जनतेचे जीवन अक्षरशः असह्य झाले आहे. शहरात महावितरणच्या कारभारावर संतापाचा उद्रेक होत आहे.
0 Comments