अकलूज येथे मराठा सेवा संघ सोलापूर व पंढरपूर विभाग जिल्हा कार्यकारणी सभा संपन्न
अकलूज (कटूसत्य वृत्त):- 10 , 11 व 12 मे 2025 रोजी अकलूज येथे, सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील स्मृती भवन शंकरनगर येथे मराठा सेवा संघाचे राज्यस्तरीय अधिवेशन संपन्न होणार असून,पुर्वतयारी संदर्भात बैठक अकलूज येथील विश्रामगृह येथे प्रदेश अध्यक्ष विजय घोगरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. सर्वप्रथम काश्मीर पहलगाम येथे दहशतवादीनी केलेल्या हल्ल्याचा निषेध सदर बैठकीत करण्यात आला. मराठा सेवा संघ प्रदेश महासचिव चंद्रशेखर शिखरे यांच्या मातोश्रीचे निधन झालेली वार्ता समजली, त्यांना देखील सदर बैठकीत शिवांजली अर्पण करण्यात आली. अतिरेकी भ्याड हल्ल्याचा निषेध व्यक्त करताना सामाजिक कार्यकर्त्या स्वयंप्रभादेवी मोहिते पाटील यांनी पहलगाम येथील हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आणि अतिरेकी संघटनेच्या विरुद्ध सर्वांनी एकजुटीने रहावे असे आवाहन त्यांनी केले. मराठा सेवा संघ राबवीत असलेल्या सामाजिक उपक्रमाचे कौतुक देखील त्यांनी केले. मराठा सेवा संघ ही संघटना सर्व जाती धर्मांना एकत्रित घेऊन काम करत आहे, याचा देखील त्यांनी उल्लेख केला. सदर मीटिंगमध्ये दिनांक दहा ते बारा मे तीन दिवस चालणाऱ्या अधिवेशनासाठी पूर्वतयारी करण्यासाठी विविध समित्या स्थापन करण्यात आल्या. 10 मे रोजी दुपारी दोन ते पाच या वेळेत अधिवेशनाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे हस्ते होणार असून त्याच दिवशी सदुभाऊ चौक ते स्मृती भवन अशी भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. अकरा तारखेला विविध सत्रात विविध विषयावर व्याख्यान होणार आहेत. सांस्कृतिक कार्यक्रम, विविध मान्यवरांचा सत्कार, विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या लोक कलावंतांचा सत्कार असे बरेच कार्यक्रम तीन दिवसात आयोजित केले आहेत. सदर कार्यक्रमाच्या तयारीसाठी बैठक आयोजित केली असून त्यासाठी केंद्रीय कार्यकारणी सदस्य इंजिनिअर उत्तमराव माने, विभागीय अध्यक्ष प्रशांत पाटील, सोलापूर अध्यक्ष जी के देशमुख, पंढरपूर विभागाचे अध्यक्ष कार्यकारी अभियंता अमित निमकर, माजी विभागीय कार्याध्यक्ष रवींद्र पवार, माजी विभागीय सचिव वनिता कोरटकर,संभाजी ब्रिगेडचे पुणे विभागीय अध्यक्ष किरण घाडगे,कार्याध्यक्ष नितीन खटके, मराठा सेवा संघ जिल्हा कार्याध्यक्ष हेमलता मुळीक, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष मनोरमा लावंड, मीनाक्षी जगदाळे ,शारदा चव्हाण ,शुभांगी शिरसागर,सुवर्णा गोरवे तसेच मराठा सेवा संघाचे सर्व तालुका अध्यक्ष निलेश देशमुख माढा,नितीन जाधव पंढरपूर, ब्रह्मदेव पवार ,शहाजीराव इंगोले सांगोला, सोमनाथ राऊत संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष, सचिन काळे करमाळा, संतोष माने सोलापूर, हनुमंत पवार ,आर पी पाटील, टि आर पाटील ,संतोष मळवणे, महेश देशमुख, अजित माने, बाळासाहेब पराडे, राजेंद्र मिसाळ, शिवाजी गवळी, शिवाजी गोडसे,निलेश मुळे इतर पदाधिकारी व सदस्य कार्यक्रमास उपस्थित होते. इंजिनीयर विजय घोगरे यांनी अधिवेशन पार पाडणे बाबत विविध कमिटी स्थापन करून सर्वांना बहुमोल असे मार्गदर्शन केले व पुढील मीटिंग दोन ते तीन दिवसात आयोजित करणे संदर्भात सर्वांना सूचना दिल्या. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सोलापूर विभागाचे उपाध्यक्ष सदाशिव पवार यांनी मांडले.
0 Comments