शरद पवार मोहिते- पाटील यांच्या उपस्थितीत सुरज देशमुख व डॉ. श्रेया पाटील यांचा शाही विवाह
देशमुख यांनी लग्न सोहळ्याची सुरुवात टेंभुर्णी गावच्या वेशीला टिळा लावून
टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- देशमुख यांच्या शाही विवाह साठी राष्ट्रवादीचे नेते शरदचंद्रजी पवार महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते- पाटील यांच्या उपस्थित अनेक मान्यवर राजकीय पुढारी, व्यापारी उपस्थित राहणार असल्याचे माहिती महाराष्ट्राच्या राष्ट्रीय महामार्गामध्ये एक नावाजलेले व्यक्तिमत्व म्हणजेच
देशमुख कंट्रक्शन अँड कंपनीचे मालक बाळासाहेब देशमुख यांचे पुत्र व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरज देशमुख व डॉ. श्रेया विपीन पाटील यांचा शाही विवाह सोहळ्याची सुरुवात टेंभुर्णी गावच्या वेशीला टिळा लावून करण्यात आली गेल्या 35 वर्षाखाली असंच टेंभुर्णीच्या वेशीला टिळा लावून टेंभुर्णी येथील व्यापारी कोठारी यांनी त्यांच्या मुलाचे लग्न लावले होते त्या नंतर पहिल्यांदाच 35 ते 50 हजार लोकसंख्येच्या गावच्या वेशीला टिळा लावून देशमुख यांनी लग्नात सर्वात केली आहे हे लग्न म्हणजे माढा तालुक्यातील व माळशिरस तालुक्यातील मोहिते पाटलानंतर हे लग्न राजकीय अनेक मान्यवर या लग्नात उपस्थित राहून आशीर्वाद देणार आहेत त्यामुळे माढा तालुक्यात एवढे मोठे पहिल्यांदाच म्हणले तर वावगे समजायला काही हरकत नाही या लग्नासाठी सोलापूर जिल्ह्यातील राजकीय मंडळी प्रमुख उपस्थित असणार आहेत त्याचबरोबर महाराष्ट्रातील राजकीय नेतेमंडळी सुद्धा उपस्थित राहणार असल्याचे समजते हा विवाह सोहळा दि. २० एप्रिल रोजी सायंकाळी ७. ४५ वाजण्याचा गोरज मुहूर्तावर श्री शारदेय गुरुकुल शाळेचा मैदानावर होणार आहे.या विवाह सोहळ्याची जय्यत तयारी सुरु असून राज्यातील नामांकित मान्यवर या विवाह सोहळायला हजेरी लावणार आहेत. टिळा लावण्याचा कार्यक्रम वेळी संपूर्ण देशमुख परिवार आणि मित्र परिवाराच्या उपस्थितीत घरातील जेष्ठ रावसाहेब देशमुख यांच्या हस्ते पार पडला.
यावेळी ग्रामदैवत श्री हनुमान चरणी सुरज देशमुख यांनी दर्शन घेतले.
टेंभुर्णी गावातील सर्वांना २० एप्रिल २०२५ रोजी होऊ घातलेल्या लग्नसोहळ्याची निमंत्रण पत्रिकाता तालुक्यात घरोघरी तर इतर ठिकाणी राजकीय व्यापारी उद्योजक व सामाजिक कार्यकर्त्यांना स्वतः हजर राहून देशमुख यांनी निमंत्रण पत्रिका दिली आहे परंतु नजरचुकीने जर कुणाला लग्नाचे निमंत्रण देयचे राहिले असेल तर गावच्या वेशीला टिळा लावण्याची प्रथा आहे. ही प्रथा देशमुख कुटुंबियांनी जोपासून गावातील प्रत्येकाला निमंत्रण पोहचवले असे मानले जाते.
हेच निमंत्रण समजून सर्वांनी या लग्न सोहळ्यास उपस्थित राहून शुभकार्यास येऊन वधू वरांना आशीर्वाद द्यावेत आव्हान रावसाहेब देशमुख यांनी केले आहे.
0 Comments