Hot Posts

6/recent/ticker-posts

मुलांसाठी पंधरा दिवसीय समर कॅम्प

मुलांसाठी पंधरा दिवसीय समर कॅम्प

 सोलापूर (कटूसत्य वृत्त):-श्री अमोगसिद्ध समाज सेवा मंडळ संचलित, लिटल स्टार पब्लिक स्कूल येथे मुलांसाठी पंधरा दिवसीय समर कॅम्प चे आयोजन करण्यात आले होते. वर्षभर मुले अभ्यासक्रम व अभ्यास करतच असतात त्याचबरोबर त्यांच्यातील विविध कलागुणांना वाव देता यावा व विद्यार्थ्यांचा शाळेचा ओढा वाढवा म्हणून विविध उपक्रम या समर कॅम्प मध्ये राबविण्यात आले.उदाहरणार्थ :- म्युझिक, डान्स, योगा,झुंबा,नो फायर कुकिंग,रेन डान्स अँड स्विमिंग, आर्ट अँड क्राफ्ट,स्टोरी टेलिंग, इत्यादी.. त्याचबरोबर अनोखा असा पशुसंवर्धनाचा उपक्रम राबविण्यात आला या उपक्रमामध्ये उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पक्षांना पाण्याची कमतरता कशी कमी पडते त्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजेत या संदर्भामध्ये माहिती देऊन. शाळेमध्ये परिसरातील झाडांना पाण्याचे कुंडे मुलांचा हस्ते अडकवून त्यामार्फत पक्षांसाठी पाणी ठेवण्यात आले तसेच पक्षांना दिलासा देण्याचं काम या उपक्रमातुन साध्य झालं.

                यावेळी संस्थेचे अध्यक्ष व मार्गदर्शक आप्पासाहेब काळे सर तसेच मुख्याध्यापिका सौ.श्रद्धा कोरे व शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments