सोलापूर टपाल विभागाने रचला इतिहास
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर विभागाचे वरिष्ठ अधीक्षक के. नरेंदर बाबू यांच्या अथक प्रयत्नांनी आणि सक्षम नेतृत्वाखाली सोलापूर विभागाने २०२४ २०२५ या आर्थिक वर्षात सर्व निकषांमध्ये सर्वोत्तम कामगिरीसाठी सर्वोत्कृष्ट विभाग पुरस्कार जिंकला आहे.पुणे येथे पार पडलेल्या क्षेत्रीय
पुरस्कार वितरणाच्या सोहळ्यात मुंबई, मुख्य पोस्टमास्टर जनरल महाराष्ट्र परिमंडळ अमिताभ सिंह,
पुणे क्षेत्राचे जनरल पोस्टमास्टर रामचंद्र जायभाये आणि पुणे क्षेत्राच्या डाक निदेशिका सुश्री सिमरन कौर यांच्या उपस्थितीत सोलापूर विभागाचे वरिष्ठ अधीक्षक के. नरेंदर बाबू यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. २०२४- २५ आर्थिक वर्षाचा पटकावला प्रथम पुरस्कार हे यश विभागातील सर्व
कर्मचाऱ्यांना समर्पित असून सोलापूर विभागाचे किर्तीमान आणि यशाचा ध्वज असाच उंच
ठेवण्यासाठी आपण यापुढेही संघटित होऊन बंधुभावाने कार्य करत राहू या, असे आवाहन बाबू
यांनी केले. अमिताभ पुणे क्षेत्राचा मानाचा फिरता चषक २०२४-२५ या वर्षासाठीचा सोलापूर विभागाने पटकाविला. या गौरव समारोह सोहळ्यात सर्वोत्तम विभाग पुरस्काराव्यतिरिक्त, सोलापूर विभागाला विविध श्रेणींमध्ये आणखी १२ पुरस्कार मिळाले. सोलापूर जिल्ह्यासाठी कर्मचाऱ्यांनी केलेल्या अविरत परिश्रमातून हे यश मिळविले आहे.यामध्ये सर्व जी. डी. एस. एम. टी. एस., पोस्टमन, सॉर्टिंग पोस्टमन, मेल ओव्हरसियर, पी.ए.,एस.पी.एम., ओ.ए., आय.पी.,ए. एस. पी. यांचे योगदान महत्त्वाचे ठरले.
0 Comments