Hot Posts

6/recent/ticker-posts

घरगुती सिलिंडरचा सर्रास व्यावसायिक वापर

 घरगुती सिलिंडरचा सर्रास व्यावसायिक वापर



कुंभारी, (कटुसत्य वृत्त):- दक्षिण सोलापूर तालुक्यातील बहुतांश हॉटेल व्यावसायिक व चहाच्या हॉटेलमध्ये छोट्या-मोठ्या दुकानांत घरगुती गॅसचा वापर होत असल्याचे चित्र पाहायला मिळत असून कोणत्याही परवान्याशिवाय धोकादायक पद्धतीने गॅस सिलिंडर हाताळला जात आहे.

वास्तविक हॉटेल व्यावसायिकांनी व्यावसायिक गॅस सिलिंडर वापरण्याची आवश्यकता आहे. मात्र, तालुक्यामध्ये सर्रासपणे घरगुती गॅस सिलिंडरचा वापर व्यवसायासाठी केला जात असल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रीय मार्गावरील छोटे व्यावसायिक हॉटलमध्ये घरगुती गॅस सिलिंडरचा वापर करीत आहेत. पुरवठा विभागाने दुर्लक्ष केल्यामुळे दिवसेंदिवस या प्रकारात वाढ होत आहे. यातून मोठा अपघात होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने यावर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

वळसंग पोलीस ठाण्यातील पोलिसांनी तालुक्यातील कुंभारी विडी घरकूल येथे याबाबतचे मोठे रॅकेट नुकतेच उघड केले. त्यात लाखांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला. परंतु येथील प्रकार हे एक उदाहरण झाले. अन्य ठिकाणीही असे प्रकार सर्रास सुरू असून त्यावर वेळीच कारवाई होण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

घरगुती गॅस सिलिंडरमधील गॅस वाहनांमध्ये भरण्याचे मोठे रॅकेट दक्षिण सोलापूर तालुक्यात आहे. वाहनांमध्ये गॅस भरताना पुरेशी काळजी घेतली जात नाही. यातून मोठा अपघात होण्याची शक्यता असल्याने यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे. घरातील गॅसचा वापर वाहनांमध्ये भरण्यासाठी होत असल्याने अनेकदा छोटे-मोठे अपघात घडल आहेत. मोठी दुर्घटना टाळण्यासाठी हॉटेल व वाहनांत गॅस भरणाऱ्यांवर कारवाईची गरज आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments