Hot Posts

6/recent/ticker-posts

खर्डी जिल्हा परिषद शाळेत इयत्ता चौथीच्या मुलांना निरोप

 खर्डी जिल्हा परिषद शाळेत इयत्ता चौथीच्या मुलांना निरोप

 


 
पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- जिल्हा परिषद शाळा खर्डी तालुका पंढरपूर येथे येथील इयत्ता चौथी या वर्गातील मुलांचा निरोप समारंभ संपन्न झाला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. प्रसाद प्रल्हाद कुलकर्णी उपस्थित होते .तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष समाधान रोंगे होते.
डॉ . कुलकर्णी यांनी मुलांना पुढील आयुष्यात आपले जीवन सुखकर होण्यासाठी काय केले पाहिजे तसेच  जीवनात कोणत्या गोष्टींना महत्व दिले पाहिजे याची माहिती मुलांना दिली.
इयत्ता चौथी मधील सर्व मुलांनी शाळेसाठी दोन भिंतीवरील पंखे भेट देण्यात आले .तसेच शाळेचे सेवानिवृत्त झालेले शिक्षक श्री नवनाथ नागणे यांना संपूर्ण कपड्याचा आहेर देऊन त्यांना निरोप देण्यात आला.
यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष स्वाती गोरख पवार, केंद्रप्रमुख कल्याण कुंभार मुख्याध्यापक मच्छिंद्र जगदाळे ,भाग्यश्री अवधूत , महादेव पवार , भोसले सर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक बालाजी शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन दादा खांडेकर यांनी तर आभार अशोक क्षीरसागर यांनी मानले.
Reactions

Post a Comment

0 Comments