सांगोला तालुक्यातील ७६ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर
सांगोला (कटूसत्य वृत्त):- तालुक्यातील ७६ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर झाल्या असून त्यामध्ये धायटी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी अनुसूचित जमाती महिला, व कोळा महूद घेरडी या मोठ्या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी सर्वसाधारण तर जवळा हे नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलासाठी आरक्षण जाहीर झाले असल्याची माहिती तहसीलदार संतोष कणसे व नायब तहसीलदार सोमनाथ साळुंखे यांनी दिली.
७६ ग्रामपंचायती पैकी १६ ग्रामपंचायत अनुसूचित जातीचे आरक्षण असून त्यामध्ये महिलांसाठी नाझरे सरगरवाडी, आगलावेवाडी, हणमंतगाव निजामपूर, लक्ष्मी नगर, मांजरी देवकते वाडी, सोनलवाडी, लोटेवाडी तर पुरुषांसाठी भोपसेवाडी, बुरंगेवाडी, खिलारवाडी, तरंगेवाडी चिक महूद, राजुरी ,वाढेगाव, अजनाळे, लिगाडेवाडी.
२१ ग्रामपंचायतीचे सरपंचपद हे नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी व इतर मागास) साठी आरक्षण जाहीर झाले असून त्यामध्ये पुरुष साठी आलेगाव, बामणी, हटकर मंगेवाडी, वासुद -केदारवाडी, पाचेगाव खुर्द, राजापूर, अचकदानी, अकोला, बुद्धीहाळ करांडेवाडी, मानेगाव तर महिलांसाठी देवळे हलदहिवडी, कडलास, संगेवाडी, गायगव्हाण, हंगिरगे, गावडेवाडी, जुजारपूर- गुणाप्पा वाडी, इटकी, बागलवाडी, शिवणे.
३८ ग्रामपंचायतीचे सरपंच पद सर्वसाधारणसाठी आरक्षण जाहीर झाले असून त्यामध्ये वाणीचिंचाळे, चोपडी, डोंगरगाव ,घेरडी ,हातीद मेडशिंगी -बुरलेवाडी, नराळे, पाचेगाव बुद्रुक, उदनवाडी ग्रुप, वाकी घेरडी, वझरे, यलमार मंगेवाडी, सोनंद, अनकढाळ गळवेवाडी, एखतपुर ,लोणविरे तर महिलांसाठी महिम ,सोमेवाडी तिप्पेहळी, डिकसळ ,गौडवाडी, ,जुनोनी -काळूबाळूवाडी, कमलापूर- गोडसेवाडी, कटफळ, किडबिसरी ,मेथवडे, पारे, शिरभावी, वाटंबरे ,वाकी शिवणे, चिंचोली, चिणके खवासपूर ,सावे ,बलवडी या ग्रामपंचायती आहेत.
सदर सरपंच पदाच्या सोडतीसाठी शेकापचे दादाशेठ बाबर, रिपाईचे खंडू सातपुते, समाधान पाटील, शिवसेनेचे सुभाष इंगोले ,शिवाजी घेरडे, शेकापचे नंदू शिंदे, संगम धांडोरे ,विष्णू देशमुख, वैभव केदार परमेश्वर कोळेकर यांच्यासह विविध पक्ष्याचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चौकट:-
सांगोला तालुक्यात एकूण ७६ ग्रामपंचायती
अनुसूचित जातीसाठी १६ , अनुसूचित जमातीसाठी १ , नागरिकांचा मागास प्रवर्ग (ना.मा.प्र) साठी २१ ,
सर्वसाधारण साठी ३८ ग्रामपंचायती
0 Comments