Hot Posts

6/recent/ticker-posts

नातेपुतेच्या सौंदर्यात भर घालणारी स्ट्रीट लाईटचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते उद्घाटन

 नातेपुतेच्या सौंदर्यात भर घालणारी स्ट्रीट लाईटचे   पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते उद्घाटन




नातेपुते (कटूसत्य वृत्त):- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त माजी आमदार राम सातपुते यांनी विशेष प्रयत्नाने नगरविकास विभागाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत नातेपुते शहरासाठी पुणे - पंढरपूर रोडवर आधुनिक स्ट्रीट लाईट बसविण्यात आली आहे.याचा उद्घाटन समारंभ पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
या समारंभास माजी आ. राम सातपुते व शरद मोरे , राजूशेठ पांढरे,नगराध्यक्षा अनिता लांडगे, मुख्याधिकारी डॉ कल्याण हुलगे, शिवसेनेचे सतीश सपकाळ, नगरसेवक भानुदास राऊत, दिपक काळे, शशिकांत बरडकर, ज्ञानेश्वर उराडे, अमित चांगण, हनुमंत ढालपे, हणमंतराव सुळ, देविदास  चांगण, राहुल पद्मन, प्रविण काळे, शशि कल्याणी,इतर मान्यवर उपस्थित होते.
 यावेळी राम सातपुते म्हणाले," मी माझ्या कारकिर्दीत संपूर्ण माळशिरस तालुक्यासाठी प्रत्येक गावाला कमीत कमी एक कोटी रुपयांचा निधी दिलेला आहे. नातेपुते शहरासाठी राज्य शासनाकडून विविध योजनांसाठी, रस्ते, गटारीसाठी, सभामंडप, मंदिरांचे जीर्णोद्धार यासाठी सुमारे   २७ कोटी रुपयांचा निधी दिलेला आहे. श्री. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावर नगर विकास खात्याच्या योजनेमधून अत्याधुनिक स्ट्रीट लाईट २ कोटी ६५ लाख रुपयांची  विशेष निधी देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून हि योजना मंजूर करून आणली . वास्तविक हे काम यापूर्वीच होणे गरजेचे होते. परंतु राजकीय कारणामुळे जाणीवपूर्वक उशिरा काम झाले आहे. यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त याचे उद्घाटन  पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते होत आहे ही आनंदाची बाब आहे.
मी जरी आमदार नसलो तरी  राज्यात व केंद्रात आपले  सरकार आहे .आजही मी मागील ती योजना व आरोग्य सेवेसाठी  तत्पर आहे हा शब्द देतो.'"
यावेळी नगराध्यक्षा अनिता लांडगे व मुख्याधिकारी डॉ कल्याण हुलगे, भानुदास राऊत यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
Reactions

Post a Comment

0 Comments