स.म. कारखान्याचे वतीने कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञानावरील ऊस शेती या परिसंवादाचे आयोजन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, April 17, 2025

स.म. कारखान्याचे वतीने कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञानावरील ऊस शेती या परिसंवादाचे आयोजन

 स.म. कारखान्याचे वतीने कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञानावरील ऊस शेती या परिसंवादाचे आयोजन




अकलूज (कटूसत्य वृत्त):- ऊस उत्पादन वाढीसाठी आर्टिफिशीयल इंटेलिजेन्स (ए.आय.) तंत्रज्ञानाचा वापर देशात सर्वप्रथम कृषी विज्ञान केंद्र, बारामती येथे करण्यात आला. सदर तंत्रज्ञानाच्या वापरामुळे सिझन 2024-25 मध्ये प्रती एकरी 30 ते 35% इतके उत्पादन वाढून मिळाले असून त्याचबरोबर 40% पर्यंत पाण्याची बचत झाली आहे.
    कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकरी यांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख होणेकरीता कारखान्याचे मार्गदर्शक संचालक व महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह शंकरराव मोहिते-पाटील व चेअरमन जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील  नेहमीच आग्रही असतात.
    कारखाना कार्यक्षेत्रातील शेतकरी यांना कृत्रिम बुद्धीमत्ता आर्टिफिशीयल इंटेलिजेन्स (ए.आय.) तंत्रज्ञान वापरल्याने जमिनीचा ओलावा, सुर्यप्रकाश, वा-याचा वेग व दिशा, तापमान, पर्जन्यमान, कीड, रोग याची पुर्व कल्पना त्याच्या नियंत्रणाची माहिती, जमिनीतील नत्र, स्फुरद व पालाश यांचा समतोल राखण्यासाठी मार्गदर्शन व माहीती पुरविली जाते. त्यामुळे ऊस पिकास या गोष्टी समतोल प्रमाणात मिळून ऊस उत्पादन वाढीसाठी मदत होत आहे.
    याबाबतची सखोल माहिती ऊस उत्पादक शेतकरी यांना होणेसाठी "ए.आय.     तंत्रज्ञानावरील भविष्यातील ऊस शेती" या विषयावर ऍ़ग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट, कृषी  विज्ञान केंद्र, बारामती यांचे मृदा शास्त्रज्ञ डॉ. विवेक भोईटे यांचे परिसंवादाचे आयोजन बुधवार दि.16 एप्रिल 2025 रोजी सकाळी 10.00 वाजता सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखाना, मुख्य कार्यालय उदय सभागृह येथे केले आहे.
    सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्याचे वतीने आयोजित केलेल्या "ए.आय. तंत्रज्ञानावरील भविष्यातील ऊस शेती" ऊस पिक परिसंवादामुळे एकरी जास्तीत जास्त उत्पादन घेणेकरीता तज्ञांचे अनमोल मार्गदर्शन होणार असल्याने परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी, सभासद व बिगर सभासद यांनी सदर परिसंवादास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन कारखान्याचे कार्यकारी संचालक  राजेंद्र केरबा चौगुले यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages