Hot Posts

6/recent/ticker-posts

मनीषाच्या एका ई-मेलमुळे डॉक्टरांची आत्महत्या अशक्य

 मनीषाच्या एका ई-मेलमुळे डॉक्टरांची आत्महत्या अशक्य

सोलापूर (कटूसत्य वृत्त):-प्रख्यात मेंदूविकारतज्ज्ञडॉ. वळसंगकर मनीषाने पाठवलेल्या एका मेमुळे ते आत्महत्या करतील असे दिसून येत नाही. 'त्या' मेलमध्ये तिने तिची व्यथा मांडली आहे. याप्रकरणात वस्तुस्थिती वेगळी आहे. सोमवारी यासह अनेक मुद्यांवर आपण मनीषा मानेच्या जामिनासाठी अर्ज करणार असल्याची भूमिका आरोपीच्या वकिलांनी स्पष्ट केली.

डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्या प्रकरणातील आरोपी मनीषा पोलिस कोठडीनंतर सध्या ९ मे पर्यंत न्यायालयीन कोठडीत आहे. मनीषाला यापूर्वी पाच दिवस पोलिस कोठडी सुनावलेली आहे, त्यामुळे तिच्यापुरता प्राथमिक तपास संपलेला आहे, असे दिसून येते. तिला न्यायालयीन कोठडीत ठेवण्यासारखी कोणतीही परिस्थिती नाही. दोन मुलांची जबाबदारी तिच्यावर आहे. यापूर्वी पोलिस तपासात सहकार्य केले होते. भविष्यातही ती सहकार्य करील, आरोपी मनीषाचे वकील प्रशांत नवगिरे यांनी स्पष्ट केले. प्रकरणात वस्तुस्थिती वेगळी आहे. एका महिलेस खोट्या गुन्ह्यात गोवण्यात आले आहे. सदर हॉस्पिटलमध्ये सन २००८ पासून सेवा बजावत आली आहे. गुन्हा दाखल होईपर्यंत फिर्यादी अथवा कोणत्याही कर्मचाऱ्यांकडून कोणतेही आरोप केलेले नव्हते. आरोपाप्रमाणे मनीषा त्रासदायक होती तर तिला जबाबदारी दिली नसती. तिला त्याच वेळी नोकरीवरून कमी केले असते अथवा तिच्याविरुद्ध तक्रारी झाल्या असत्या, असे आरोपींच्या वकिलांचे म्हणणे आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments