Hot Posts

6/recent/ticker-posts

टेंभुर्णीत सकल जैन समाजाचा आक्रोश मोर्चा

 टेंभुर्णीत सकल जैन समाजाचा आक्रोश मोर्चा

टेंभुर्णी, (कटूसत्य वृत्त):- मुंबई विलेपार्ले येथील जैन मंदिर बुधवार (दि.१६) एप्रिल रोजी बीएमसी प्रशासनाद्वारे पोलीस बंदोबस्तात पूजाअर्चा अभिषेक चालू असताना सर्व भक्तांना सक्तीने बाहेर काढून जेसीबी मशीन द्वारे उध्वस्त करण्यात आले. याच घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी टेंभुर्णी सकल जैन समाजाच्या वतीने हा मोर्चा काढण्यात आला. शहरातील आदिनाथ दिगंबर जैन मंदिर मारवाडी गल्ली शुक्रवार पेठ येथून टेंभुर्णी ग्रामपंचायत वेश येथून टिळक रोड  मोर्चा काढण्यात आला मोर्चामध्ये टेंभुर्णी शहरातील आदिनाथ दिगंबर जैन मंदिर मारवाडी गल्ली शहर व परिसरातील जैन बांधवांनी सहभागी होऊन हातामध्ये फलक घेत
आक्रोश मोर्चात घोषणा चालू होत्या......

"डर के नहीं, डट के खडा है पुरा जैन समाज.. मंदिर वही बनायेंगे, आस्था को नहीं मिटायेंगे.. हम सब एक है. तभी तो जैन धर्म सेफ है.. मंदिर हमारी आस्था है, इसे नही मिटने देंगे.. जैन समाज छोटा है, ताकत उसकी बड़ी है... रुकेगे ना झुकेंगे, मंदिर वही बनायेंगे, 

 मंदिरावरील हल्ले थांबलेच पाहिजे.. साधू संतावर हल्ले थांबलेच पाहिजे.. तीर्थरक्षा, धर्म रक्षा.. झालीच पाहिजे
हम शांत है. कमजोर नही.. शांती आमचा स्वभाव आहे, कमजोरी नाही..

पाडलेले मंदिर बांधून दिलेच पाहिजे.. आशा घोषणा  पुनम शहा देत होत्या त्यांच्या पाठीमागे सर्व समाज घोषणा देत होता 
साधू सुरक्षित, समाज सुरक्षित...
विविध घोषणा देत घटनेचा निषेध नोंदवला.

मोर्चा मारवाडी गल्ली शुक्रवार पेठ चांदणी चौक टिळक रोड  सोलापूर- पुणे राष्ट्रीय महामार्ग  कुर्डूवाडी चौक, एसटी बस स्थानका पासून  वळवून टेंभुर्णी पोलीस स्टेशन गेटवर आल्यानंतर सकल जैन समाजाच्या वतीने टेंभुर्णी पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले.
टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या अनुपस्थित टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांनी निवेदन स्वीकारले निवेदन देता वेळी
आदीनाथ जैन मंदीर अध्यक्ष सनदकुमार शहा,अजीतनाथ जैन मंदीर अध्यक्ष मनीष व्होरा
श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावकसंघ व सराफ व सुवर्णकार असोसिएशन चे अध्यक्ष महेश कोठारी, वर्घमान संघाचे उपाध्यक्ष गणेश सोनिग्रा,  मदन शहा,विजयकुमार कोठारी नंदकुमार दोशी, वैभव गांधी, प्रसन्न शहा ,नयन शहा, स्वप्निल धोका, मानीक कोठारी, विकास कोठारी, परीमल दोशी, महेश कोकीळ, प्रशांत गांधी, महावीर ओस्तवाल,पराग व्होरा, मुन्ना शहा,  मनोज शहा, विरांग मेथा, स्वप्नील शहा,अतुल गांधी, संजय शहा, रत्नदीप भालेराव ,अतुल चंकेश्वरा.  बाळासाहेब सुराणा, दिलीप कोठारी,तसेच या मध्ये महीला सौ पुनम शहा, श्रेया व्होरा, भारती मेथा सौ सोनल शहा, अधिक महिला पुरुष यामध्ये सामील झाले होते टेंभुर्णी पोलीस स्टेशनला निवेदन दिल्यानंतर मोर्चेची सांगता झाली

Reactions

Post a Comment

0 Comments